Home माझं पिंपरी चिंचवड Indian Culture:माफी मागण्याने माणूस लहान नाही, तर मोठा होतो

Indian Culture:माफी मागण्याने माणूस लहान नाही, तर मोठा होतो

माफी मागण्याने माणूस मोठा होतो | अजितदादा पवार शोकसभा | महेशदादा लांडगे माफी

by Admin
Spread the love

 

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले आणि त्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः शोकसागरात (Indian Culture )बुडाला.

 

बघता-बघता या दुःखद घटनेला तीन दिवस उलटले, मात्र आजही त्या धक्क्याची तीव्रता तशीच आहे. दादांवर प्रेम करणारा प्रत्येक जण अजूनही सुन्न अवस्थेत (Indian Culture) आहे.

या निमित्ताने राज्यभरात, शहराशहरात, गल्लीगल्लीत (Indian Culture)  दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, समर्थक, सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीने शोकसभा घेत आहेत. कुणी डोळ्यांतून अश्रू वाहू देत आहे, तर कुणी आठवणींच्या ओघात गहिवरून जात(Indian Culture) आहे.

काल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस (दादा गट)च्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शहरातील अनेक दिग्गज नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि असंख्य सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित(Indian Culture) होते.

प्रत्येक जण आपल्या शब्दांत, आपल्या भावना व्यक्त करत होता. कुणी हमसून रडत होते, कुणी स्तब्धपणे आठवणींमध्ये हरवले होते.या शोकसभेत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी (Indian Culture)ठरली.

कधी काळी अजितदादांचे निकटवर्तीय आणि समर्थक असलेले महेशदादा गेल्या काही वर्षांत दादांपासून दूर गेले. राजकीय मतभेदांमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काही प्रसंगी दादांविरोधात उघडपणे भूमिका (Indian Culture)घेतली.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी दादांवर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यावर उत्तर देताना अजितदादांनीही आपल्या खास शैलीत, “मी तुला डाव दाखवला तर पवारची औलाद नाही,” असे ठणकावून सांगितले (Indian Culture)होते.

या राजकीय कलगीतुऱ्यामुळे पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.पण नियतीने वेगळाच निर्णय(Indian Culture) घेतला…

दादा अचानक निघून गेले आणि सगळे वाद, आरोप-प्रत्यारोप, राजकीय गणिते एका क्षणात निरर्थक (Indian Culture)ठरली.

मात्र “मरावे परी वैर जपू नये” या भारतीय संस्कृतीला जागत, काल त्या शोकसभेत महेशदादा लांडगे यांनी केवळ ४० सेकंदांत जे केले, ते अनेक मोठ्या भाषणांपेक्षा अधिक बोलके(Indian Culture) होते.

दादांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी जाहीरपणे माफी मागितली.कोणतीही सबब नाही, कोणताही राजकीय फायदा नाही — फक्त मनापासून आलेले शब्द.त्या ४० सेकंदांत त्यांनी केवळ माफी मागितली नाही, तर हेही दाखवून दिले की राजकारणाच्या पलीकडे माणुसकी असते, अहंकाराच्या पलीकडे संस्कार (Indian Culture)असतात.

माफी मागणे ही कमजोरी नसून, तीच खरी ताकद आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले.आजच्या कट्टर राजकीय वातावरणात, जिथे द्वेष टिकवून ठेवला जातो, तिथे अशा क्षणांनी आशा जिवंत(Indian Culture) राहते.

अजितदादा पवार यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी अपूरणीय हानी आहेच, पण त्यांच्या जाण्यानंतर घडलेला हा क्षण आपल्याला एक महत्त्वाचा धडा देऊन (Indian Culture)जातो—

सत्ता, पदे, पक्ष येतात-जातात…

माणुसकी, संस्कृती आणि माफी मात्र माणसाला मोठे करून जाते.

अजितदादांना हीच खरी (Indian Culture)श्रद्धांजली. 🙏

विवेक कुलकर्णी


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00