निगडी(प्रतिनिधी):निगडी परिसरातील बजाज कंपनीसमोर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना गेल्या दीड वर्षांपासून तीव्र दुर्गंधीचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संताप व्यक्त केला (Pollution In PCMC) जात आहे.
स्थानिक नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) तसेच संबंधित बजाज कंपनीकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत(Pollution In PCMC) आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण विषय स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पूर्णपणे माहिती असतानाही कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुर्गंधीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, श्वसनाचे आजार, डोकेदुखी, मळमळ यासारख्या समस्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे (Pollution In PCMC)आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी थेट इशारा देत महानगरपालिका निवडणुकीपूर्वी याप्रकरणी योग्य ती आणि प्रभावी कार्यवाही व्हावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा आगामी निवडणुकीत तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.तसेच निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारावांना सुद्धा एक प्रकारे संदेशही दिला (Pollution In PCMC) आहे.
दरम्यान, बजाज कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांनी लावलेले फलक सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली (Pollution In PCMC)जात आहे.
