14
पिंपरी :प्रश्न विचारणे हे विचारशीलतेचे आणि बौद्धिक प्रगल्भतेचे लक्षण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय व भारतीय विचार साधना, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. गिरीश आफळे लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सभागृहात पार (Rss Ideology) पडला.
