Home महाराष्ट्र Children Poetry Event:संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये बाल काव्य मैफल 2025 उत्साहात संपन्न

Children Poetry Event:संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये बाल काव्य मैफल 2025 उत्साहात संपन्न

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नक्षत्राचं देणं काव्यमंच व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाल काव्य मैफल 2025 आयोजित करण्यात आली.

by Admin
Spread the love

पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी :कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’ व पिंपरी–चिंचवड महानगरपालिका (प्राथमिक शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल काव्य मैफल–२०२५ उत्साहात पार पडली. पिंपरी–चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही मैफल विशेष, अनोखी आणि (Children Poetry Event) प्रेरणादायी ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आली.ज्येष्ठ कवी व साहित्यिक तुकाराम पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे म्हणून संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, पिंपरी–चिंचवड मनपा) उपस्थित होत्या. विशेष उपस्थितीत श्रीकांत चौगुले (ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, समन्वयक), कवी वादळकार, पोलीस कवी विनायक विधाटे, कवी सुरेशचंद्र चनाल, गायक सुभाष चव्हाण, मुख्याध्यापिका सुनीता विधाटे, जुई यादव, सहभागी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित(Children Poetry Event) होते.

अध्यक्षीय भाषणात तुकाराम पाटील म्हणाले,

“आजचा हा कार्यक्रम बालमनात काव्याचा फुलोरा फुलवणारा आहे. या व्यासपीठावरून भविष्यात अनेक कवी घडतील. बालकवींनी सादर केलेल्या कविता अत्यंत सुंदर असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पुढील काळात काव्य कार्यशाळा घेणे अपेक्षित आहे. पिंपरी–चिंचवड शहरात हा काव्यसोहळा अत्यंत भारदस्तपणे संपन्न (Children Poetry Event) झाला आहे.”

श्रीकांत चौगुले यांनी मनोगतात सांगितले की,

“पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या १०० शाळांमध्ये ‘एक तास कवितेचा – कवी तुमच्या भेटीला’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. आजचा कार्यक्रम त्या लिहित्या होत असलेल्या बालकवींसाठीच आहे. मुलांच्या मनात कवितेची बीजे घट्ट रुजली असून भविष्यात उत्तम कवी व लेखक तयार होतील. लवकरच बालकाव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा संकल्पही (Children Poetry Event)आहे.”

यावेळी मान्यवरांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व सहभागी बालकवींना आकर्षक फोर-कलर सन्मानपत्र देऊन गौरविण्यात( Children Poetry Event)आले.

हा कार्यक्रम पिंपरी–चिंचवड मनपा कन्या शाळा, चिंचवड स्टेशन, पुणे–१९ येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बालकवींनी विविध विषयांवरील स्वतःच्या कविता सादर करून मैफलीत (Children Poetry Event)रंगत आणली.

या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे (संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, नक्षत्राचं देणं काव्यमंच) यांनी विनामूल्य केले.कार्यक्रमाची सांगता विश्वगीत पसायदानाने( Children Poetry Event)करण्यात आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00