पिंपरी-चिंचवडच्या यमुनानगर परिसरात एका व्यक्तीने हायटेंशन टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली. पोलिस, महावितरण कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेने त्याचा जीव (Tower Incident) वाचला.
पिंपरी-चिंचवड : यमुनानगर परिसरात एका मनोरुग्ण व्यक्तीने हायटेंशन वीज टॉवरवर चढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. विजेचा शॉक बसण्याचा धोका आणि जीवितहानीची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Tower Incident) होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले(Tower Incident) होते.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेत वीजपुरवठ्याबाबत उपाययोजना केल्या, तर पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर थांबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. अखेर सर्वांच्या संयम आणि सतर्कतेमुळे त्या व्यक्तीला सुखरूप खाली उतरवण्यात यश(Tower Incident) आले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून पुढील कार्यवाही सुरू (Tower Incident)आहे.
आमचे वाचक आणि आकुर्डी येथील शिक्षक गणेश भोणे सर यांच्याद्वारे ही बातमी माझंपिंपरीचिंचवड. इनच्या वाचकांसाठी
