Home प्रेरणा / यशकथा Praful Ketkar:आणीबाणीत संघाने लोकशाही टिकवली – प्रफुल्ल केतकर पिंपरी-चिंचवड : संघ शताब्दी मंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Praful Ketkar:आणीबाणीत संघाने लोकशाही टिकवली – प्रफुल्ल केतकर पिंपरी-चिंचवड : संघ शताब्दी मंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित संघ शताब्दी मंथन कार्यक्रमात प्रफुल्ल केतकर यांनी आणीबाणीत संघाची भूमिका, राष्ट्रचेतना जागृती आणि राष्ट्रनिर्मितीवर भाष्य केले.

by Admin
Spread the love

चिंचवड, दि. २६ : लोकशाहीत संघर्ष नव्हे तर संवाद आवश्यक असून, आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी (Praful Ketkar) केले.

 

पिंपरी-चिंचवड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ऑटोक्लस्टर प्रेक्षागृहात आयोजित संघ शताब्दी मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी आणि विभाग प्रचार प्रमुख पंकज जयस्वाल उपस्थित(Praful Ketkar) होते.

 

केतकर म्हणाले, वैभवशाली राष्ट्रनिर्मितीसाठी राष्ट्रचेतना जागृती गरजेची आहे. जाती, पंथ, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवणे आवश्यक आहे. संघ गेली १०० वर्षे हे कार्य सातत्याने करत (Praful Ketkar)आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना जनतेमध्ये सहभागाची भावना निर्माण केली. आत्मबोध आणि शत्रूबोध यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. सामर्थ्यशाली भारत ही केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक स्वावलंबनाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी (Praful Ketkar)सांगितले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व भारतमाता पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सारंग पापळकर यांनी केले. पंकज जयस्वाल यांनी पंचपरिवर्तन विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी तर आभार वैभव वाघोलीकर यांनी मानले. प्रज्ञा फुलपगार यांनी वंदे मातरम् सादर (Praful Ketkar)केले.

 

कार्यक्रमाला शहरातील माध्यम, सामाजिक व वैचारिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित(Praful Ketkar) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00