Home गुन्हे Sangvi Police Action:पिंपरी-चिंचवडमध्ये ३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक, साथीदार फरार

Sangvi Police Action:पिंपरी-चिंचवडमध्ये ३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक, साथीदार फरार

पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलिसांनी ३७ लाख ९ हजार रुपये किमतीचा ७४.१८ किलो गांजा जप्त केला. एका आरोपीला अटक तर साथीदार फरार असून शोध सुरू.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सांगवी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत ३७ लाख ९ हजार रुपये किमतीचा ७४.१८ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू (Sangvi Police Action) आहे.

 

१६ एप्रिल २०२६ रोजी रात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना एका निर्जन ठिकाणी काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवर पांढरे पोते घेऊन उभा असलेला संशयित इसम दिसला. पोलिसांनी चौकशीचा प्रयत्न करताच तो पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला (Sangvi Police Action)पकडले.

 

अटक आरोपीचे नाव गणेश कैलास चव्हाण (वय ३०, रा. गणेगाव खलसा, ता. शिरूर) असे आहे. त्याच्याकडून ७ लाख रुपये किमतीचा १४ किलो गांजा आणि मोटारसायकल जप्त करण्यात (Sangvi Police Action) आली.

 

पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने साथीदार विनोद ज्ञानेश्वर झरे याच्या मदतीने मोठा साठा लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील घराजवळील म्हशीच्या गोठ्यात छापा टाकून ३० लाख ९ हजार रुपये किमतीचा ६०.१८ किलो गांजा जप्त करण्यात(Sangvi Police Action) आला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांच्या पथकाने केली असून फरार आरोपीचा शोध सुरू (Sangvi Police Action) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00