Home प्रेरणा / यशकथा Arun Borhade Book:साल्हेर किल्ल्यावर युनेस्को वारसा यादीतील बारा किल्ले पुस्तकाचे मुखपृष्ठ अनावरण

Arun Borhade Book:साल्हेर किल्ल्यावर युनेस्को वारसा यादीतील बारा किल्ले पुस्तकाचे मुखपृष्ठ अनावरण

महाराष्ट्रातील सर्वोच्च साल्हेर किल्ल्याच्या शिखरावर अरुण बोऱ्हाडे लिखित ‘युनेस्कोच्या वारसा यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.

by Admin
Spread the love

पिंपरी :महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साल्हेर किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे लिखित ‘युनेस्कोच्या वारसा यादीतील छत्रपती शिवाजीमहाराजांचे बारा किल्ले’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक वारशाचा गौरव करणारा हा आगळा-वेगळा सोहळा दुर्गप्रेमींसाठी (Arun Borhade Book)विशेष ठरला.

या प्रसंगी दुर्गप्रेमी प्रा. डॉ. अमित तापकीर, गिर्यारोहक प्रदीप डोंगरे, हर्ष बोऱ्हाडे, युवराज गवळी यांच्यासह लेखक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती (Arun Borhade Book)होती.

संवेदना प्रकाशनमार्फत प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची सविस्तर माहिती तसेच त्यांचा संक्षिप्त पण अभ्यासपूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. या किल्ल्यांचे ऐतिहासिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले (Arun Borhade Book)आहे.

अरुण बोऱ्हाडे हे इतिहासाचे अभ्यासक व अनुभवी गिर्यारोहक असून त्यांनी सह्याद्रीतील अनेक शिखरे व घाटवाटा पादाक्रांत केल्या आहेत. महाराष्ट्रातील सुमारे सव्वादोनशे गडकिल्ल्यांना त्यांनी अभ्यासपूर्ण भेटी दिल्या आहेत. यापूर्वी त्यांचे ‘जिंजी, वेल्लोर आणि तंजावर’ हे दुर्गभटकंतीवरील पुस्तक प्रकाशित झाले असून इतिहासप्रेमी व दुर्ग अभ्यासकांमध्ये त्याला चांगला प्रतिसाद लाभला( Arun Borhade Book)आहे.

साल्हेर किल्ल्यासारख्या ऐतिहासिक स्थळी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण होणे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाला मानवंदना ठरली असून, नव्या पिढीमध्ये इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असे मत यावेळी उपस्थितांनी ( Arun Borhade Book) व्यक्त केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00