Home गुन्हे Dehuroad Firing:देहूरोड गोळीबारानंतर पोलिसांचा धडाकेबाज एक्शन; ८ लाखांचा शस्त्रसाठा जप्त, चौघे जेरबंद

Dehuroad Firing:देहूरोड गोळीबारानंतर पोलिसांचा धडाकेबाज एक्शन; ८ लाखांचा शस्त्रसाठा जप्त, चौघे जेरबंद

देहूरोड गोळीबारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हे शाखेने ९ देशी कट्टे, ४६ काडतुसेसह ८ लाखांचा शस्त्रसाठा जप्त करत चार आरोपींना अटक केली.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : देहूरोड परिसरातील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने चार आरोपींना अटक करत सुमारे ८ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त (Dehuroad Firing) केला.

 

या कारवाईत ९ देशी कट्टे, ५ मॅगझिन, ४६ जिवंत काडतुसे तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली. अटक आरोपींमध्ये अब्दुलहमीद शेख (येरवडा), वैभव अडसूळ (काळेवाडी), सौरभ लाड आणि अजयराज कांबळे (दोघेही पाषाण) यांचा समावेश (Dehuroad Firing) आहे.

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करत उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई(Dehuroad Firing) केली.

 

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग पुढील तपास करत आहेत. पोलिसांची ही कारवाई शहरातील अवैध शस्त्रसाठ्यावर आळा घालणारी ठरत (Dehuroad Firing) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00