Home तंत्रज्ञान Anisha Reversible Bench:श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या अनिशा शिंदेचा ‘ॲडव्हान्स रीव्हर्सिबल बेंच’ राज्यस्तरावर झळकणार

Anisha Reversible Bench:श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या अनिशा शिंदेचा ‘ॲडव्हान्स रीव्हर्सिबल बेंच’ राज्यस्तरावर झळकणार

by Admin
Spread the love

श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या अनिशा शिंदेचा ‘ॲडव

प्रतिनिधी:आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनियर कॉलेजमधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी अनिशा अरविंद शिंदे हिच्या “ॲडव्हान्स रीव्हर्सिबल बेंच” या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची निवड भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (नवी दिल्ली), महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (मुंबई), महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था (नागपूर), जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि फ्लोरा इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना 2023–24 व 2024–25 अंतर्गत आयोजित विज्ञान प्रदर्शन दिनांक 13 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत फ्लोरा इन्स्टिट्यूट, खोपी (ता. भोर, जि. पुणे) येथे पार पडले.

 

या प्रदर्शनात श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या अनिशा शिंदे हिच्या “ॲडव्हान्स रीव्हर्सिबल बेंच” या प्रकल्पाची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली आहे.

अनिशाने साकारलेला हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या दैनंदिन बसण्याच्या सुविधेला नवे आयाम देणारा आहे. वर्गातील उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर, आसन रचनेतील लवचिकता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा लक्षात घेऊन तिने हा मॉडेल विकसित केले आहे. दुहेरी वापर, सहज उलट–पालट करता येणारी रचना, हलकी पण मजबूत संरचना तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर ही प्रकल्पाची वैशिष्ट्ये परीक्षकांच्या विशेष लक्षात आली.

 

शाळास्तरीय आणि जिल्हास्तरीय फेरीत प्रभावी सादरीकरण करत अनिशाने आपले तांत्रिक कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध केला. तिची कल्पकता, चिकाटी आणि संकल्पनेची उत्तम मांडणी यामुळेच तिला राज्यस्तरावर स्थान मिळाले आहे. लहान वयात केलेल्या या अभिनव कार्यातून तिच्या उज्ज्वल भविष्याची झलक दिसून येते.

 

भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनात अनिशा आपला प्रकल्प सादर करणार असून तिच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

या यशाबद्दल अनिशा, तिचे पालक अरविंद शिंदे तसेच मार्गदर्शक शिक्षिका पूजा चौधरी, कल्पना घोलप आणि नारायण पिंगळे यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, विज्ञान समिती प्रमुख उदमले सर, सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

https://youtu.be/kmdwat_-zwY?si=bngpn5jNlFUk-1e5


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00