Home गुन्हे Sheetal Tejwani:शीतल तेजवानी प्रकरण : पिंपरीतील माहेरावर पोलिसांचा छापा

Sheetal Tejwani:शीतल तेजवानी प्रकरण : पिंपरीतील माहेरावर पोलिसांचा छापा

जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेल्या शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरावर पुणे पोलिसांचा छापा. मूळ दस्तऐवज आणि 300 कोटींच्या व्यवहाराशी संबंधित पुराव्यांचा शोध

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरावर पुणे पोलिसांनी छापा टाकून महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या शोधासाठी झाडाझडती सुरू केली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेल्या शीतलने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार मूळ कुलमुखत्यारपत्र, इतर मूळ दस्तऐवज तसेच 300 कोटी रुपयांच्या व्यवहारातील काही रक्कम येथे लपवून ठेवली असण्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. वैष्णोदेवी मंदिराजवळ असलेल्या तिच्या माहेरातील घरात हे पुरावे दडवले असल्याचा पोलिसांना (Sheetal Tejwani)संशय आहे.

शीतल आणि तिचे पती सागर सूर्यवंशी हे सध्या पुण्यात राहत असले तरी महत्त्वाचे पुरावे पिंपरीतील माहेरी साठवले गेले असावेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी असून पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन वादग्रस्त पद्धतीने खरेदी करण्यात आल्याचा आरोप (Sheetal Tejwani )आहे.

तपासातील अनियमितता उघड झाल्यानंतर शीतलची दोन वेळा चौकशी झाली होती आणि अखेर तिला अटक करण्यात आली. एफआयआर रद्द करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाकडून तात्काळ दिलासा मिळाला नाही. या प्रकरणातील गुन्हे बावधन पोलीस ठाण्यासह पुणे पोलिसांकडे नोंदवले गेले असून एकूण नऊ (Sheetal Tejwani )जणांवर कारवाई सुरू आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00