Home माझं पिंपरी चिंचवड BJP NCP Nurakushti:भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांची ‘नुरा कुस्ती’; दोघेही “चोर चोर मौशेरे भाई” – सुषमा अंधारे

BJP NCP Nurakushti:भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांची ‘नुरा कुस्ती’; दोघेही “चोर चोर मौशेरे भाई” – सुषमा अंधारे

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार महेश लांडगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप ही नुरा कुस्ती असून निवडणुकीनंतर भाजप व राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी टीका शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी पिंपरी येथे केली.

by Admin
Spread the love

पिंपरी:उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असले, तरी ही लढाई केवळ दिखाऊ असून ती नुरा कुस्ती आहे. निवडणुका संपल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन “चोर चोर मौशेरे भाई” प्रमाणे जनतेच्या पैशाची लूट करतील, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पिंपरी येथे (BJP NCP Nurakushti) केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगत आली असून, गुरुवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पिंपरी परिसरात बैठका व सभा (BJP NCP Nurakushti)घेतल्या.

गुरुवारी पुनावळे–ताथवडे–वाकड परिसरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार (ड) आणि सागर विजय ओव्हाळ (अ) यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवार चेतन पवार, सागर ओव्हाळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, प्रभारी अशोक वाळके, रोमी संधू, रामभाऊ सपकाळ, कैलास नेवासकर, विकास पवार, सुमित निकाळजे, राहुल पवार, विजय दगडे, नितीन शिंदे, धनंजय पवार, संदीप बोरगे, हरीश सपकाळ, किरण पवार, किसन ओव्हाळ, सागर पवार, कृष्णा पवार, नरेश गराडे, निलेश पवार, अक्षय भोसले, योगेश पवार, आशिष मिश्रा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (BJP NCP Nurakushti) होते.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना (उबाठा) चे चेतन पवार विरुद्ध भाजपचे राहुल कलाटे यांच्यातील लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार (BJP NCP Nurakushti) आहे.

निवडणूक आयोगावर टीका करताना त्या म्हणाल्या की, आयोगाकडून पक्षाशी भेदभाव केला जात आहे. आमच्या पक्षाचे मशाल चिन्ह प्रिंटिंगमध्ये स्पष्ट दिसत नाही. यापूर्वी तुतारी व पिपाणीच्या चिन्हांबाबत जसा घोळ घातला गेला होता, तसाच प्रकार यावेळी मशाल चिन्हाबाबत होत आहे. मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असून, याबाबत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मशाल चिन्हाबाबत संदिग्धता निर्माण होऊ देण्याचे काम आयोग करीत असल्याचा आरोप त्यांनी (BJP NCP Nurakushti)केला.

पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी घोषित करण्यात आले असले, तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या शहराचे वाटोळे केले आहे, असा आरोप करताना अंधारे म्हणाल्या की, ताथवडे परिसर महापालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्षे झाली तरी जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याची समस्या, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट, अनधिकृत बांधकामे, जमीन अधिग्रहण व नव्याने समाविष्ट गावांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे असतानाही भाजप व राष्ट्रवादी भ्रष्टाचारात गुंग (BJP NCP Nurakushti) आहेत.

महेश लांडगे यांनीच महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा सूत्रधार अजित पवार असल्याचे म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही चौकशी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. मग अशा व्यक्तीला भाजपने सोबत का घेतले, हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर भ्रष्टाचार झाकण्याचा आरोप केला. अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप म्हणजे कोकणात भाचे जसे भांडतात, तशीच ही नुरा कुस्ती असल्याचे त्यांनी (BJP NCP Nurakushti) सांगितले.

महेश लांडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिनिधी असल्याचा आरोप करत अंधारे म्हणाल्या की, निवडणुकीनंतर भाजप व राष्ट्रवादी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करतील. त्यामुळे हे दोन्ही पक्ष म्हणजे “चोर चोर मौशेरे भाई” आहेत. शिवसेना (उबाठा) हा मात्र तत्वनिष्ठ पक्ष असून आम्ही संविधानिक चौकटीत राहून राजकारण करतो, असे त्यांनी स्पष्ट (BJP NCP Nurakushti)केले.

भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या की, लोकांना धमकावून निवडणूक प्रक्रिया बिघडवू नये. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही तेच असे गलिच्छ राजकारण करतात. या राजकीय संस्कृतीच्या ऱ्हासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी (BJP NCP Nurakushti) केला.

खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे नेतृत्व असून, शिवसेना ही नेतृत्व घडविणारी संघटना आहे. भाजप मात्र दुसऱ्या पक्षातील नेते पळवून आणून त्यांची काळजी घेण्याचे काम करीत आहे. दुसऱ्यांची माणसे घेऊन पक्ष मोठा होत नाही, ही भाजपची वाढ नसून सूज आहे, असा घणाघात करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लुटीला जबाबदार कोण, याचे उत्तर भाजप व राष्ट्रवादीने मतदारांना द्यावे, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी (BJP NCP Nurakushti)दिले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00