निगडी येथे आयोजित मधुश्री व्याख्यानमालेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी काश्मीरच्या भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वावर भाष्य (Chandrashekhar Tilak) केले.
प्रतिनिधी :पिंपरीतील निगडी प्राधिकरण येथे आयोजित मधुश्री व्याख्यानमालेच्या अंतिम सत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी “काश्मीरचे भौगोलिक स्थान हे जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू आहे,” असे प्रतिपादन केले. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘जागतिक राजकारण आणि काश्मीर’ या विषयावर ते बोलत (Chandrashekhar Tilak)होते.
मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी गिरीश प्रभुणे होते. उपमहापौर शर्मिला बाबर, प्रदीप पवार, माधुरी ओक, राजेंद्र बाबर आणि अजित देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती(Chandrashekhar Tilak) होती.
चंद्रशेखर टिळक म्हणाले की, काश्मीर हा अनेक वर्षांपासून धुमसणारा प्रश्न असला तरी तो भविष्यात मार्गी लागेल, याबाबत आपण आशावादी आहोत. पूर्वीच्या दहशतवादग्रस्त काश्मीर आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीत मोठा फरक दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि भारत यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिकांवर भाष्य करत काश्मीरच्या भौगोलिक महत्त्वावर त्यांनी सविस्तर विवेचन (Chandrashekhar Tilak) केले.
अध्यक्षीय भाषणात गिरीश प्रभुणे यांनी भविष्यात काश्मीर प्रश्नावरून मोठे युद्ध उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री अत्रे यांनी केले, तर किरण कुलकर्णी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता (Chandrashekhar Tilak) झाली.
