Home प्रेरणा / यशकथा Cultural Program:यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रम संपन्न | पिंपरी-चिंचवड

Cultural Program:यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रम संपन्न | पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड येथील यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा उत्साहात पार पडली. सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम, कवयित्रींचा सत्कार व प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रम रंगला.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी पावन मारुती मंदिर, यमुनानगर येथील नाना-नानी उद्यानातील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार (Cultural Program) पडली.

सभेची सुरुवात संघप्रार्थनेने झाली. त्यानंतर कै. स्मिता इनामदार व कै. सुधीर जपे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले यांनी प्रास्ताविक(Cultural Program) केले.

यानंतर सौ. उषा गोविंद खवासखान यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषण झाले. त्यांनी अन्नदान, कन्यादान, सत्पात्री दान, तसेच महिलांचे कालचे व आजचे स्थान, जुनी संस्कृती, संस्कार, परंपरा, प्रथा व जुन्या-नव्या काळातील बदल यावर उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा उल्लेख करत स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित(Cultural Program) केले.

यावेळी ‘पिंपरी-चिंचवड वैभव’ या महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा व मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या काव्यमय इतिहासात्मक पुस्तकात संघातील तीन कवयित्रींचा सहभाग असल्याचा विशेष अभिमान व्यक्त करण्यात आला. यानिमित्ताने कवयित्री माधुरी डिसोजा, सौ. मंगला पाटसकर व सौ. सुहासिनी येवलेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने (Cultural Program) जिंकली.

तसेच डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सौ. सुशीला कवळे, सौ. उषा जोशी, सौ. मालती जोशी आणि श्री. विठ्ठलराव तुपे यांचाही विशेष सत्कार करण्यात (Cultural Program) आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगला पाटसकर यांनी केले. श्री. दत्तात्रय गुंजाळ, बाळासाहेब चव्हाण, अशोक नहार, प्रदीप मुजुमदार, अण्णा रसाळ, प्रमोद देवकर आणि श्री. गोविंद खवासखान यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार (Cultural Program) पडला.

शेवटी सौ. मंगला पाटसकर यांनी आभार मानले. चहापान व अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता (Cultural Program) झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00