पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडत पहिला विजय नोंदवला असून, प्रभाग क्रमांक ६ मधील ‘ब’ जागेवरून भाजपचे उमेदवार रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले (Ravi Landge Unopposed) आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भेदत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे खाते उघडण्याची कामगिरी रवी लांडगे यांनीच केली होती. यंदाही त्यांनी हीच परंपरा कायम राखत पुन्हा एकदा बिनविरोध निवड मिळवली (Ravi Landge Unopposed)आहे.
या प्रभागात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यानंतर निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. यामध्ये श्रद्धा लांडगे (रवी लांडगे यांच्या पत्नी) आणि प्रसाद ताठे यांचा समावेश होता.
श्रद्धा लांडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय सुरुवातीपासूनच स्पष्ट केला होता. मात्र प्रसाद ताठे यांच्या माघारीबाबत अनिश्चितता होती. अखेर रवी लांडगे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर प्रसाद ताठे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. परिणामी रवी लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड निश्चित (Ravi Landge Unopposed) झाली.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपला मोठे यश मिळाले असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बिनविरोध निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात (Ravi Landge Unopposed) आहे.
