पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पक्षाने पहिला मोठा विजय नोंदवला आहे. ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण (Supriya Chandgude) झाले आहे.
या विजयामागे आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाचे व संघटन कौशल्याचे मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे. प्रभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामांची ठोस हमी आणि पक्षावर असलेला जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर भाजपला स्पष्ट यश मिळाल्याचे आमदार अमित गोरखे यांनी (Supriya Chandgude)सांगितले.
सुप्रिया चांदगुडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर प्रभागातील विकासाला गती मिळणार असून, महिलांच्या नेतृत्वाला मिळालेली ही संधी विशेष उल्लेखनीय असल्याचे राजकीय व सामाजिक वर्तुळातून मत व्यक्त करण्यात येत आहे. आगामी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाय यांवर प्राधान्य देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया चांदगुडे यांनी (Supriya Chandgude)दिली.
हा विजय पिंपरी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक मानला जात असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी हा विजय महत्त्वाचा ठरत (Supriya Chandgude)आहे.
