मुग्धा, प्रथमेश जोडीची “मर्मबंधातली ठेव”मोरया भक्तांच्या काळजात वसली
महासाधू मोरया गोसावी यांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित उत्सवात कालच्या दुसऱ्या दिवशी सारेगमप लिटल चॅम्प्स पहिल्या पर्वाची लाडकी जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या जोडीने आपल्या मर्मबंधातली ठेव या संगीत रजनीच्या कार्यक्रमाने शब्दश: मंत्रमुग्ध( Morya Mahotsav) केले.
मानवी जीवनात काही वेळा कधी कधी अगदीच अनपेक्षित रित्या कळत नकळत एखाद्यावर जीव जडतो, इतका की तो/ती आपले कुणीही नसताना सुद्धा ते आपल्याला जणू रक्ताच्या नात्याइतकेच जवळचे (Morya Mahotsav) होतात.
असेच दोन नावे म्हणजे झी टीव्हीवरील सारेगमपच्या पहिल्या पर्वातल्या लिटल चॅम्प्स पंचरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या गायकातले माऊ आणि लाडू म्हणून ओळखले जाणारे अलिबागची मुग्धा आणि रत्नागिरीचा प्रथमेश ही (Morya Mahotsav) जोडी.
त्या पाच जनातली सर्वात लहान म्हणून सर्वांची लाडकी झालेली आणि आपल्या गोड आवाजाने सर्वांची मुलगी झालेली मुग्धाने आपल्या बालपणीचा प्रथमेशदादा सोबत सप्तपदी चालण्याचा निर्णय घेतला आणि संगीतवेडा महाराष्ट्र या बातमीने मनापासून खुश झाला.लग्नानंतर प्रथमच चिंचवड मध्ये आलेल्या या जोडीला काल डोळेभरून पाहण्यासाठी आणि कानात त्यांचे दैवी सप्तसुरु साठवण्यासाठीकाल मोरया मंदिर परिसरात विक्रमी गर्दी झाली होती.संपूर्ण परिसर अक्षरशः पॅक झाला होता, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात होते ते कुतूहल आणि कौतुक
त्या सगळ्यांना न्याय देताना या जोडीने आपल्या सुरेल गायनाने खरोखरचं मंत्रमुग्ध केले, खिळवून (Morya Mahotsav) ठेवले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; br
आबालवृद्ध या कार्यक्रमात एकाच जागी शेवटच्या गाण्यापर्यंत बसून होते याहून अधिक योग्य वर्णन या कार्यक्रमाचे होऊच शकत नाही.
श्रीराम भजनाने सुरुवात झालेल्या या संगीत रजनीत या भजनाच्या अंतिम कडव्यात प्रथमेशने उपस्थित श्रोत्यांना ठेका धरायला लावला आणि हा सुर शेवटपर्यंत म्हणजेच अवघा रंग एक झाला या भैरवी (Morya Mahotsav) पर्यंत.
यात विशेष उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे या जोडीने एकही हिंदी गाणं घेतलं नाही, नवे गाणे नव्हते पण तरीही एकही श्रोता जाग्यावरून उठला नाही की वैतागला नाही.
प्रभो विघ्नहर्ता, तुज मागतो मी आता, जय शंकरा करुणाकरा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सोहम हर डमरू बाजे, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, काळ देहासी आला खाऊ अशा एकापेक्षा एक अजरामर गाण्यांची ही मैफिल रसिकांच्या मनात चिरकाल वसणार यात काहीच शंका (Morya Mahotsav)नाही.
याच मैफिलीतली एक विशेष बाब म्हणजे प्रथमेशने कन्नडी भजन राधास्वामी लक्ष्मीरमना हे भजन गायला सुरुवात केली आणि ही भाषा समजत नसताना देखील अनेक रसिकांनी मनापासून ताल धरला यातच एक चार पाच वर्षाची छोटूली मुलीने जो ठेका पकडला तो पाहून श्रोत्यासह सहभागी कलाकार सुद्धा चकित झाले, त्यामुळेच कदाचित आपल्या रसाळ पण प्रासंगिक अभ्यासू निवेदनाने रसिक श्रोत्यांना वेगळाच आनंद देणाऱ्या विघ्नेश जोशी या अभिनेत्या असणाऱ्या निवेदकाने आपल्याला मिळालेली मोरयाची महावस्त्र म्हणून मानाची मिळालेली शाल तिला सप्रेम देताच उपस्थित श्रोत्यांनी उभे राहून दाद देताच हा प्रसंग खरोखरचं अजरामर झाला.
या अवीट मैफिलीत चे निवेदन विघ्नेश जोशी यांनी यथार्थ करत आपली अवीट छाप पाडली.
तबल्यावर रुपक वझे हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी,व्हायोलीनवर उदय गोखलेतर पखवाजाची साथ: प्रथमेश देवधर यांच्या सह ताल व टाळ याची साथ विश्वास कळमकर या सहकलाकारांनी अप्रतिमरित्या देत हा कार्यक्रम खूपच उंचीवर (Morya Mahotsav) नेला.
अशा मैफिली कधीच संपू नयेत असे भाबड्या मनाला वाटत असले तरी जे वाटते तेच होते असे नसते ना, त्यामुळेच ही मैफिल मनात साठवत श्रोते महोत्सव आयोजकांना मनोमन धन्यवाद देत घरी (Morya Mahotsav)परतले.
आजच्या या संगीत रजनीसाठी सुद्धा चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव विश्वस्त जितेंद्र देव, विश्वस्त केशव विद्वांस, विश्वस्त ॲड. देवराज डहाळे हे मुख्य पाहुणे आणि रसिक म्हणून तसेच यजमान म्हणून संपुर्ण वेळ कार्यक्रमात उपस्थित होते,त्यांच्याच हस्ते कलाकारांचा यथार्थ सन्मान केला गेला आणि रसिकांनी पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम होत राहोत हेच मागणे मोरया चरणी मागितले असणार याबद्दल माझ्या मनात तरी (Morya Mahotsav)कसलीही शंका नाही.
विवेक कुलकर्णी
