Home गुन्हे PCMC Commissioner:औद्योगिक परिसरातील सुरक्षा व गस्त वाढ बैठक

PCMC Commissioner:औद्योगिक परिसरातील सुरक्षा व गस्त वाढ बैठक

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या उपस्थितीत औद्योगिक परिसरातील उद्योजकांसोबत चोरी, अनधिकृत माथाडी संघटना, वाहतूक कोंडी आणि पोलीस गस्त वाढवण्याबाबत बैठक पार पडली. आयुक्तांनी सर्व विभागांना त्वरित कारवाईचे आदेश दिले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वाढत्या चोऱ्या, अनधिकृत माथाडी संघटना, भंगार दुकाने व वाहतूक कोंडी या गंभीर प्रश्‍नांबाबत पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांच्यात बैठक झाली. ही बैठक दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी चिंचवड येथील पोलिस आयुक्त कार्यालयात पार (PCMC Industry Safety)पडली.

बैठकीस पोलिस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, तसेच पोलिस आयुक्त कार्यालयातील डेप्युटी पोलिस कमिशनर उपस्थित होते. संघटनेतर्फे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, संचालक संजय सातव आणि स्वीकृत संचालक संजय भोसले यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांचे निवेदन (PCMC Industry Safety)
सादर केले.

औद्योगिक परिसरात तळवडे, सोनवणे वस्ती, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर ७ व १०, एमआयडीसी भोसरी, पिंपरी, चिंचवड या भागात चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकांना घाबरवून चोरी करत असल्याचे संघटनेने नमूद केले. अनेक कंपन्यांनी सीसीटीव्ही बसवूनही चोरींचा तपास लागत नसल्याचेही (PCMC Industry Safety)सांगण्यात आले.

अट्टल चोरट्यांवर कठोर व कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या चोरांकडून महिला कामगारांची छेडछाड, दागिने चोरी तसेच पुरुष कामगारांवर हल्ले व लुटमार होत असल्याची तक्रारही पोलिस आयुक्तांना देण्यात आली. कामगारांच्या ये-जा वेळेत पोलीस गस्त वाढवण्याची मागणी(PCMC Industry Safety)संघटनेने केली.

स्वयंघोषित अनधिकृत माथाडी कामगार संघटना उद्योगांना धमक्या देऊन प्रोटेक्शन मनी मागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. या त्रासामुळे अनेक उद्योजक उद्योग स्थलांतरित करण्याच्या विचारात असल्याचे (PCMC Industry Safety)बैठकीत नमूद केले.

औद्योगिक परिसरातील चोरी झालेल्या भंगाराची विक्री परिसरातील अनधिकृत भंगार दुकानांत होत असल्याने अशा दुकानांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी झाली. तसेच चाकण आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचेही सांगण्यात (PCMC Industry Safety) आले.
.

सन २०१३ मध्ये संघटनेने प्रायोगिक गस्ती पथक चालवले होते; त्यावेळी चोरीचे प्रमाण कमी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत हा उपक्रम पोलीस विभागानेच राबवावा, अशी मागणीही संघटनेने केली.

उत्तरादाखल बोलताना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की शहरात आतापर्यंत १८०० लोकांवर कारवाई झाली असून त्यापैकी ८५३ सराईत गुन्हेगारांवर मोक्का लावून तडीपारी करण्यात आली आहे. त्यांनी कंपन्यांना गेटवर व परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन(PCMC Industry Safety) केले.

अनधिकृत भंगार दुकाने हटवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. वाहतूक कोंडीबाबत आयुक्त म्हणाले की उद्योजकांच्या सहकार्याने अतिरिक्त वाहतूक सहाय्यक नेमून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच कामगार सुटण्याच्या वेळेत कंपनी व्यवस्थापनाने बदल करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी (PCMC Industry Safety)
सुचविले.

रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांसोबत सुरक्षा रक्षक व उद्योग कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दर तीन महिन्यांनी औद्योगिक क्षेत्रातील आढावा बैठक घेऊन कामकाजाचा अहवाल देण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

पुढील बैठकीत माथाडी संघटना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसी अधिकार्‍यांसोबत संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.अशी माहिती पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे  (PCMC Industry Safety)अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00