(विवेक कुलकर्णी )ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील सभ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंड (ब्लॅक कॅप्स) संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. पहिल्या सामन्यापासून सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध खेळ करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला मात्र या निर्णायक लढतीत किवीजसमोर अपेक्षित खेळ करता आला( T20 World Cup 2026) नाही.
दक्षिण आफ्रिकेची डळमळीत सुरुवात
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. प्रोटीयाजची सुरुवात अत्यंत निराशाजनक (T20 World Cup 2026) झाली.
कईंटन डीकॉक , ऐडेन मार्क्रम आणि रायली रॉसौ हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर देवाल्ड ब्रेवीस व डेविड मिलर देखील लवकर माघारी परतल्याने आफ्रिका ५ बाद ७७ अशा बिकट अवस्थेत(T20 World Cup 2026) सापडला.
या टप्प्यावर दीडशे धावांचाही टप्पा गाठणे कठीण वाटत होते. मात्र अष्टपैलू मार्को जानसेन याने धाडसी आणि जबाबदारीची फलंदाजी करत नाबाद अर्धशतक झळकावले. त्याच्या झुंजार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला १६८ धावांची तुलनेने सन्मानजनक धावसंख्या उभारता (T20 World Cup 2026)आली.

किवीजची तुफानी सुरुवात
१६९ धावांचे लक्ष्य कागदावर आव्हानात्मक वाटत असले तरी किवीजच्या सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला.
टीम शेइफेर्ट आणि फिंन आलेन या जोडीने पहिल्याच षटकापासून आफ्रिकन गोलंदाजांवर हल्ला (T20 World Cup 2026)चढवला.
पहिल्या सहा षटकांत पन्नासपेक्षा अधिक धावा
चार षटकांत अर्धशतकी भागीदारी
क्षेत्ररक्षण मर्यादा संपेपर्यंत बिनबाद ८८ धावा
या जोडीने शतकी सलामी देत आफ्रिकेची गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ केली. सायफर्टने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो बाद झाला, मात्र तोपर्यंत सामना न्यूझीलंडच्या ताब्यात गेला(T20 World Cup 2026) होता.
फिन अॅलेनचे वादळी शतक
या सामन्याचा खरा नायक ठरला फिन आलेन
अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक
पुढील केवळ १४ चेंडूत शतक पूर्ण
त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे न्यूझीलंडने अवघ्या १२.५ षटकांत केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले. हा विजय केवळ मोठा नव्हे, तर पूर्णपणे एकतर्फी आणि दमदार होता. अॅलेनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात(T20 World Cup 2026) आला.
पुन्हा दबावाखाली अपयशी प्रोटीयाज
महत्त्वाच्या लढतीत दबाव पेलण्यात दक्षिण आफ्रिका संघाला पुन्हा अपयश आले. मोठ्या सामन्यांत गडबड करण्याची प्रतिमा या पराभवाने आणखी ठळक झाली. खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत (T20 World Cup 2026)होती.
अंतिम फेरीकडे आत्मविश्वासाने वाटचाल
संपूर्ण स्पर्धेत अचूक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि आक्रमक फलंदाजी यांचा उत्कृष्ट संगम साधणाऱ्या ब्लॅक कॅप्सने अंतिम फेरीत प्रवेश करत विजेतेपदाच्या आशा अधिक बळकट केल्या (T20 World Cup 2026)आहेत.
आता अंतिम सामन्यात त्यांचा आत्मविश्वास, संघभावना आणि शिस्तबद्ध खेळ कायम राहतो का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.क्रिकेटविश्वासाठी ही अंतिम लढत नक्कीच संस्मरणीय ठरणार (T20 World Cup 2026)आहे
