Home गुन्हे Shankar Jagtap:काळेवाडी–रहाटणीतील दारू दुकानांवर कारवाई; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

Shankar Jagtap:काळेवाडी–रहाटणीतील दारू दुकानांवर कारवाई; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

काळेवाडी–रहाटणी परिसरातील दोन दारू दुकानांचे परवाने निलंबित. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळात मुद्दा उचलत कारवाईची मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर नियमावली जाहीर करत अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

by Admin
Spread the love

काळेवाडी–रहाटणी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या दोन दारू दुकानांवर कारवाई करण्यासाठी ठाम भूमिका घेत आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळात आवाज उठवला—आणि अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. विक्रांत वाईन शॉप आणि बजाज देशी दारू दुकान या दोन्ही दुकानांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून नवीन जागा निश्चित होईपर्यंत ही (Shankar Jagtap) दुकाने बंद राहणार आहेत.

या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष न करता, आमदार जगताप यांनी परिसरातील महिलांवर, नागरिकांवर होणाऱ्या त्रासाचे स्पष्ट वर्णन सभागृहात मांडले. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दारू दुकानांच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल जाहीर करत कठोर (Shankar Jagtap) भूमिका घेतली.

आमदार शंकर जगताप यांचा ठाम पवित्रा

काळेवाडी–रहाटणी परिसरातील सह्याद्री सरकारी गृहसंस्था, अनंत पार्क, शिवतीर्थ सहकारी गृहसंस्था, श्रीनगर येथील नागरिकांनी विक्रांत वाईन शॉप आणि बजाज देशी दारू दुकानांबद्दल (Shankar Jagtap) वारंवार तक्रारी केल्या होत्या.

दारू पिऊन गोंधळ, भांडण, महिलांना त्रास, अपघातांच्या घटना… या सर्व गोष्टींमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. हा सगळा विषय आमदार शंकर जगताप यांनी विधिमंडळात ठामपणे मांडताच वातावरण गंभीर झाले आणि तत्काळ (Shankar Jagtap) कारवाईची मागणी जोर धरू लागली.

“परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असताना अशा दुकानांना परवानगी कशी दिली जाते?” असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरही (Shankar Jagtap) बोट ठेवले.

कठोर नियमावली जाहीर

आमदार जगताप यांच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात पुढील (Shankar Jagtap) नियमावली जाहीर केली :

सोसायटीची एनओसी शिवाय दारू दुकानांना परवानगी नाही.

स्थलांतरित होणाऱ्या दुकानांच्या नवीन जागेची शहानिशा अनिवार्य.

नागरिकवस्ती, शाळा, (Shankar Jagtap) धर्मस्थळांच्या जवळ परवाने न देण्यावर भर.

दोषींवर कारवाईचे आदेश

अपूर्ण इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसताना दारू दुकानांना परवानगी देणाऱ्या महापालिका व उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री (Shankar Jagtap) पवार यांनी दिली.

आमदार जगताप: “नागरिकांच्या लढ्याला न्याय मिळाला”

“काळेवाडी–रहाटणी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर होता. महिलांचा त्रास, वाढती गुन्हेगारी, अपघात…हे सर्व थांबलेच पाहिजे. माझा पाठपुरावा यशस्वी झाला आणि या दोन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले (Shankar Jagtap) हे नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे,”
— शंकर जगताप, आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड

या निर्णयानंतर परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून सर्वांनी आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले(Shankar Jagtap) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00