पिंपरी (प्रतिनिधी) : “प्रतिभावंतांनी केवळ लिहिण्याची घाई न करता अत्युच्च स्फूर्तीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. कवयित्री शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार (दि. ६) रोजी कविवर्य राजन लाखे लिखित ‘बेलाच्या पानावर…’ या हायकूसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत(Marathi Literature)होते.
याMarathi Literature कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम काळे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ यांच्यासह लेखक राजन लाखे यांची प्रमुख उपस्थिती(Marathi Literature) होती.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, “कवितेलाही एक आचारसंहिता असते, याचा विसर आज अनेक कवींना पडलेला दिसतो. मुक्तछंदाला मोकाट छंदाचे स्वरूप आले असताना ‘बेलाच्या पानावर…’ मधील छंदबद्ध आणि आशयसंपन्न हायकू मनाला समाधान देणारे आहेत. राजन लाखे यांच्या कवितेत तंत्र आणि प्रतिभेचा सुंदर मिलाफ दिसून येतो. सत्याचे सखोल दर्शन घडविण्यासाठी प्रतिभेची आवश्यकता (Marathi Literature)असते.”
सुनीताराजे पवार यांनी, “अल्पाक्षरी हायकूच्या माध्यमातून व्यापक आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य ‘बेलाच्या पानावर…’ या संग्रहातून प्रकर्षाने जाणवते,” असे मत व्यक्त केले. विनोद कुलकर्णी यांनी, “राजन लाखे हे कविता आणि कवी म्हणून जगणारे व्यक्तिमत्त्व आहे,” असे गौरवोद्गार (Marathi Literature)काढले.
लेखक राजन लाखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सतरा अक्षरे आणि तीन ओळींच्या मर्यादेत बांधलेला हायकू हा मूळ जपानी काव्यप्रकार असून कवी मात्सुओ बाशो यांनी त्याला प्रतिष्ठा दिली, तर शिरीष पै यांनी तो मराठीत रूढ केला. या मर्यादेत राहून सुमारे २४० हायकूंच्या माध्यमातून आशयप्रधान भावनांचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला (Marathi Literature)आहे.”
यावेळी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखाध्यक्षांचा तसेच या ग्रंथनिर्मितीत योगदान देणारे नंदकुमार मुरडे, सुप्रिया ऐनापुरे आणि अजित जमदाडे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात(Marathi Literature) आला.
कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या किरण जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, श्रीकांत जोशी, किशोर पाटील, इला पवार व नीलिमा फाटक यांनी केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. भूषण तोष्णीवाल यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता (Marathi Literature)झाली.
