पिंपरी–चिंचवड :अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी धडक कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा, पाच मोबाईल फोन आणि दोन स्कोडा कार असा सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Crime News) आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच सह पोलीस आयुक्त आणि उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ डिसेंबर रोजी पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील सिलाई स्टोअरजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात (Crime News)आली.
या वेळी दोन स्कोडा कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पुरुष व महिलांचा समावेश असून ते पुणे परिसरातील विविध भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या गांजासह वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला (Crime News) आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींच्या माध्यमातून आंतरराज्य पातळीवरील गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्याची माहितीही पोलिसांनी दिली (Crime News) आहे.
अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवले जात असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जातील, असे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा कार्यालयाशी किंवा ८६००००२३२० या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले (Crime News) आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, स्वप्निल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, गणेश करपे, ज्ञानेश्वर मुळे, शिल्पा कांबळे, गोविंद डोके, चिंतामण सुपे, रणधीर माने, निखिल वर्षे, कपिलेश इगवे, संतोष सपकाळ यांच्या पथकाने केली. तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस अंमलदार नागेश माळी आणि सुभाष गुरव यांनी सहकार्य (Crime News) केले.’
