Home आरोग्य Anti Narcotics Raid:चिंचवडमध्ये पानात ‘नशे’चा मसाला; धक्कादायक प्रकार उघड

Anti Narcotics Raid:चिंचवडमध्ये पानात ‘नशे’चा मसाला; धक्कादायक प्रकार उघड

चिंचवडमध्ये पानामध्ये अमली पदार्थ मिसळून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पोलिसांची कारवाई, आरोपी अटक आणि मोठा मुद्देमाल जप्त.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. २२ : चिंचवड परिसरात पानामध्ये अमली पदार्थांची पावडर मिसळून ग्राहकांना दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणांना व्यसनाच्या गर्तेत ओढण्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत (Anti Narcotics Raid)आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथील एका पान स्टॉलवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७५० ग्रॅम वजनाची अमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त करण्यात आली. या पावडरची बाजारातील किंमत सुमारे ४० हजार रुपये प्रति किलो असून, पोलिसांनी एकूण सुमारे ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला (Anti Narcotics Raid)आहे.

या प्रकरणात ज्ञानेश्वर नामदेव वानखेडे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी) याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात तो पानामध्ये ही पावडर मिसळून ग्राहकांना ‘स्पेशल किक’ देण्याच्या नावाखाली विक्री करत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः तरुणांना आकर्षित करून त्यांना व्यसनाधीन बनवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पुढे आली(Anti Narcotics Raid) आहे.

या प्रकारामुळे शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सततच्या कारवायांमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, आता अशा ‘नशेच्या’ जाळ्यावर पोलिसांचे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले(Anti Narcotics Raid) आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेतला जात (Anti Narcotics Raid)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00