Home महाराष्ट्र Devasthan Inam:आकुर्डीत देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विषयक मार्गदर्शन सभा

Devasthan Inam:आकुर्डीत देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विषयक मार्गदर्शन सभा

आकुर्डीतील खंडोबा मंदिरात महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विषयक मार्गदर्शन सभा पार पडली.

by Admin
Spread the love

आकुर्डी, दि. 31 मे : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026’ संदर्भात आकुर्डी येथील खंडोबा मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भाविक आणि हिंदू समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित (Devasthan Inam) होते.

 

सभेत ह.भ.प. चोरघे महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट आणि मंदिर विषयांचे अभ्यासक महेश पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावित कायद्यामुळे देवस्थानांच्या जमिनी व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होऊन मंदिरांच्या दैनंदिन व्यवस्थापन, पूजाविधी, धार्मिक उत्सव तसेच धर्मादाय उपक्रमांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता उपस्थितांनी व्यक्त (Devasthan Inam)केली.

 

मंदिरांना नियमित शासकीय आर्थिक मदत मिळत नसताना अशा कायद्याच्या परिणामांबाबत व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत सभेत मांडण्यात आले. तसेच शासनाने मंदिर विश्वस्त, धार्मिक संस्था, कायदे तज्ज्ञ आणि समाजप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात (Devasthan Inam) आली.

 

यावेळी समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने डॉ. सचिन बोधनी यांनी मंदिरांच्या हितरक्षणासाठी संघटनेचा विरोध कायम राहील, असे स्पष्ट केले. सभेच्या शेवटी मंदिरांच्या आर्थिक व धार्मिक हितांचे संरक्षण करणारा निर्णय शासनाने घ्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात (Devasthan Inam) आली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00