Home पुणे PCMC NCP Statement:पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक : मतदार याद्यांतील गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप व्यक्त

PCMC NCP Statement:पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक : मतदार याद्यांतील गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप व्यक्त

तातडीने दुरुस्तीची मागणी

by Admin
Spread the love

पिंपरी–चिंचवड प्रतिनिधी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या चुका, चुकीचे विभाजन, दुबार नावे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलाच उचलून धरला आहे. शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना याबाबत निवेदन सादर करण्यात( PCMC NCP Statement) आले.

निवेदनात म्हटले आहे की, १६ जुलै २०२५ रोजी आयोगाने स्पष्ट आदेश दिले असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये गंभीर अनियमितता झाल्या आहेत. प्रभागाच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे योग्य प्रभागात समाविष्ट करण्यासाठी स्थळ पाहणी करणे आवश्यक असूनही प्रत्यक्षात कोणतीही शाहनिशा न करता संपूर्ण वस्त्या, परिसर किंवा इमारतींचे गट चुकीच्या प्रभागात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही प्रभागांत तर ५ हजारांहून अधिक मतदारांचे चुकीचे विभाजन झाल्याचे बहल यांनी निदर्शनास आणून ( PCMC NCP Statement)दिले.

सेक्शन अॅड्रेसचा गोंधळ वाढवतोय त्रास
सेक्शन अॅड्रेस चुकीचा किंवा अपूर्ण असल्यास प्रत्यक्ष भौगोलिक हद्द तपासून नाव समाविष्ट करण्याची सूचना आयोगाने दिली होती. मात्र हा नियम पाळण्यात आला नाही. परिणामी एकाच वस्ती किंवा इमारतीतील शेकडो नागरिकांची नावे इतर प्रभागांत समाविष्ट झाल्याचे राष्ट्रवादीने निवेदनात नमूद केले (PCMC NCP Statement )आहे.

ऑनलाईन सर्च सुविधा नसल्याने मतदारांची पंचाईत
मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF याद्या ‘सर्च’ करू न शकणाऱ्या स्वरूपात आहेत. फोटो नसल्यामुळे एकाच नावाचे अनेक मतदार असल्यास अधिक गोंधळ निर्माण होत असून नागरिकांना नाव शोधण्यासाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागत आहे, असे बहल यांनी (PCMC NCP Statement )सांगितले.

दुबार–तिबार नावे प्रचंड संख्येत; कार्यवाही शून्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, शहरात एक लाखांहून अधिक दुबार–तिबार नावे असून आयोगाने दिलेल्या ९२ हजार नावांच्या याद्यांसह स्वतः पक्षानेही १२ हजार संशयित नावे पुराव्यासहित प्रशासनाकडे दिली आहेत. तरीसुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी खंत बहल  (PCMC NCP Statement) यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मागण्या :

• मतदारांना नाव, पत्ता किंवा EPIC क्रमांकावरून शोधता येईल अशी ऑनलाईन/अॅप सर्च सुविधा उपलब्ध करणे.
• PDF याद्यांमध्ये ‘सर्च’ सुविधा तातडीने समाविष्ट करणे.
• चुकीचे विभाजन झालेल्या वस्त्या व इमारतींची स्थळ पाहणी करून Suo-Moto दुरुस्ती करणे.
• प्रभाग स्तरावर मतदार सहाय्यता केंद्रे स्थापन करणे.
• हरकती दाखल करण्यासाठीची मुदत वाढवणे आणि ऑनलाइन हरकतीची सुविधा देणे.
• दुबार–तिबार नावांची तपासणी व दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे.
• त्रुटींवरील चौकशीसाठी महापालिका  (PCMC NCP Statement) आयुक्तांना अधिकार देणे.

शहरातील मतदारांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ( PCMC NCP Statement) पक्षाने केली आहे.

 

चिंचवड येथे झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष योगेश बहल यांच्या सह माजी आमदार विलास लांडे, माजी उपमहापौर मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते, एकूणच आजच्या राष्ट्रवादीच्या या पत्रकार परिषदेने शहरात विरोधी पक्ष बऱ्यापैकी सक्रिय झाल्याचे जाणवत असल्याने कार्यकर्ते नक्कीच समाधानी आणि सकारात्मक आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00