Home आरोग्य Jnpv Walkethan:चरैवेति चरैवेति Walkathon | ज्ञान प्रबोधिनी निगडी आरोग्यव्रत उपक्रम

Jnpv Walkethan:चरैवेति चरैवेति Walkathon | ज्ञान प्रबोधिनी निगडी आरोग्यव्रत उपक्रम

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र पालक महासंघ आयोजित ‘चरैवेति चरैवेति’ Walkathon मध्ये २५००हून अधिक नागरिकांचा सहभाग. फिट इंडिया संकल्पनेवर आधारित आरोग्यव्रत उपक्रमाची यशस्वी सांगता.

by Admin
Spread the love

 चरैवेति चरैवेति : चालण्यातून उमललेले आरोग्यसंस्कार

चरैवेति चरैवेति — चालत राहा, थांबू नका. ही प्राचीन पण कालातीत शिकवण प्रत्यक्ष कृतीत उतरवत, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र पालक महासंघाच्या वतीने भव्य Walkathon चे आयोजन करण्यात आले. समाजात वाचनसंस्कृती रुजवणे, सजग व सशक्त नागरिक घडवणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम प्रभावीपणे साकारला (Jnpv Walkethan) गेला.

हे Walkathon म्हणजे ‘आरोग्यव्रत’ या उपक्रमाची सांगता होती. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला प्रतिसाद देत, पालक महासंघाने ‘फिट प्रबोधिनी’ या विचारधारेवर आधारित आरोग्यव्रत उपक्रमाचे नियोजन केले होते. या उपक्रमासाठी ४०० हून अधिक पालकांनी नोंदणी करून आरोग्याचा संकल्प ( Jnpv Walkethan) केला.

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00