प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात घडलेल्या भीषण विषारी दारू दुर्घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन (Pcmc Hooch Tragedy) केले.
यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या दुर्घटनेला संबंधित यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला. परिसरात बेकायदेशीररीत्या विषारी रसायनांचा वापर करून गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाकडे असतानाही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी नमूद (Pcmc Hooch Tragedy)केले.
दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक पोलीस चौकी आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ कागदोपत्री कारवाया दाखवून जबाबदारी झटकणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी (Pcmc Hooch Tragedy) केली.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. भविष्यात पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक व कामगार वस्त्यांमध्ये अशा प्रकारच्या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट (Pcmc Hooch Tragedy) केले.
तसेच विषारी दारूमुळे बाधित झालेल्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असून, दोषींना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी (Pcmc Hooch Tragedy) दिला.
या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत (Pcmc Hooch Tragedy) आहे.
