Home गुन्हे Hinjewadi Job Scam: नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक; हिंजवडीत आयटी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

Hinjewadi Job Scam: नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंची फसवणूक; हिंजवडीत आयटी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

हिंजवडीतील आयटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोकरी व प्रशिक्षणाचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप. ११.२५ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : हिंजवडीतील विप्रो सर्कल परिसरात एका आयटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोकरी आणि प्रशिक्षणाचे आमिष दाखवून अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून आयटी क्षेत्रात खळबळ उडाली (Hinjewadi Job Scam)आहे.

 

याबाबत देहूरोड येथील रहिवासी आणि सध्या शिक्षण घेत असलेले सौरव राजन नायर (वय २५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ‘थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हर्षल भानुदास ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभागप्रमुख ध्रुविल पारेख, एचआर अधिकारी सौम्या सिंग तसेच इतर संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला(Hinjewadi Job Scam) आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ पासून हिंजवडी फेज-२ येथील विप्रो सर्कल परिसरातील गेरा इंपेरिअम राईज इमारतीमधील कार्यालयातून हा प्रकार सुरू होता. आरोपींनी विविध तरुणांना नोकरीची संधी आणि प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देत प्रत्येकी १५ हजार रुपये अनामत रक्कम कंपनीच्या खात्यात जमा करण्यास (Hinjewadi Job Scam)सांगितले.

 

यानंतर संबंधित तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच त्यांच्याकडून कंपनीची प्रत्यक्ष कामेही करून घेण्यात आली. मात्र, सुमारे दोन महिन्यांनंतर कोणतेही ठोस कारण न देता विविध कारणे पुढे करून त्यांना कामावरून कमी करण्यात आले. यानंतर संबंधितांनी पगाराची मागणी केली असता त्यांना वेतन देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला(Hinjewadi Job Scam) आहे.

 

तक्रारीनुसार, अनामत रक्कम आणि दोन महिन्यांचे थकीत वेतन अशा स्वरूपात एकूण ११ लाख २५ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. आरोपींनी संगनमत करून हा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरत तरुणांचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला (Hinjewadi Job Scam)आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत असून आणखी काही तरुण या फसवणुकीचे बळी ठरल्याची शक्यता वर्तविण्यात येत (Hinjewadi Job Scam)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00