Home प्रेरणा / यशकथा We Together Foundation:वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे सावली निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदतीचा हात

We Together Foundation:वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे सावली निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदतीचा हात

पिंपरीतील सावली निवारा वृद्धाश्रमात वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे निराधार ज्येष्ठ नागरिकांना कपडे, औषधे, प्रथमोपचार पेटी आणि खाऊ वाटप करण्यात आले.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २६ : सामाजिक कार्यासाठी नेहमी सक्रिय असलेल्या वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे पिंपरी येथील सावली निवारा वृद्धाश्रमातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना कपडे, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक औषधे आणि खाऊ वाटप करण्यात (We Together Foundation)आले.

 

शहरातील विविध भागांतून आणलेल्या निराधार वृद्धांचे सावली निवारा आश्रमात निशुल्क संगोपन केले जाते. त्यामुळे या आश्रमाला सातत्याने मदतीची गरज भासत असते. याच भावनेतून फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात (We Together Foundation)आला.

 

“आश्रमातील ज्येष्ठांचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी मोठे दातृत्व असून त्यांची सेवा सतत घडत राहावी,” अशी भावना मधुकर बच्चे यांनी व्यक्त (We Together Foundation) केली.

 

या उपक्रमाच्या आयोजनात उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार कुशाल दुसाने, माजी अध्यक्ष सलीम सय्यद, विलास गटने, रंगाराव कुकाला, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे आदींनी सहभाग (We Together Foundation)घेतला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00