Home पुणे Suryadatta Education Foundation:सूर्यदत्तमध्ये सिद्धी जोहरींचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश; “स्मार्ट विचार करा!”

Suryadatta Education Foundation:सूर्यदत्तमध्ये सिद्धी जोहरींचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश; “स्मार्ट विचार करा!”

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण आणि सामाजिक भान विकसित करण्याचा संदेश दिला.

by Admin
Spread the love

पुणे : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक विचार, संवादकौशल्य, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण विकसित करणे आवश्यक आहे. “स्मार्ट दिसण्याबरोबरच स्मार्ट विचार करा,” असा संदेश ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’ आणि महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय राजदूत सिद्धी जोहरी यांनी सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना (Suryadatta Education Foundation)दिला.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन येथील बन्सीरत्न सभागृहात आयोजित प्रेरणादायी कार्यक्रमात सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांशी संवाद साधला. आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना अडचणींमधून शिकत पुढे जाण्याचे आणि स्वतःवर विश्वास ठेवून ध्येय निश्चित करण्याचे आवाहन (Suryadatta Education Foundation)केले.

“सकारात्मक दृष्टिकोन, चांगले व्यक्तिमत्त्व आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तितकीच महत्त्वाची आहे. स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजासाठीही सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करा,” असे जोहरी यांनी (Suryadatta Education Foundation)सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सौ. अश्विनी देशपांडे यांनी सिद्धी जोहरी यांचा परिचय करून दिला. त्यानंतर सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा व सचिव सौ. सुषमा एस. चोरडिया यांच्या हस्ते जोहरी यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोप देऊन गौरव करण्यात (Suryadatta Education Foundation)आला.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सिद्धी जोहरी यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि नेतृत्वगुणांनी समृद्ध महिला आजच्या युवा पिढीसाठी, विशेषतः विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गसंवर्धनासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय (Suryadatta Education Foundation)आहे.”

यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यावहारिक आणि प्रेरणादायी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन (Suryadatta Education Foundation)केले.

 

या कार्यक्रमाला प्राचार्या किरण राव, उपाध्यक्षा व सचिव सौ. सुषमा संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, प्रवक्ते दत्ता कोहिणकर यांच्यासह प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित (Suryadatta Education Foundation)होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00