प्रतिनिधी :गुन्हे शाखा युनिट 01 ची उल्लेखनीय कारवाई-परराज्यातील मजुरांना मारहाण करून लूट करणाऱ्या दोघांना अटक; 1.32 लाखांचा मुद्देमाल (PCMC Crime Branch) जप्त
पिंपरी-चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) – परराज्यातील मजुरांना जबरदस्तीने मारहाण करून त्यांचे मोबाईल व पैसे लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखा युनिट 01 ने अटक केली आहे. आरोपींकडून एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले (PCMC Crime Branch) आहे.
गुन्हे शाखा युनिट 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक चैन चोरी, वाहन चोरी व जबरी चोरी संदर्भात पेट्रोलिंग करत होते. सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 43/2026 (भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4), 3(5)) या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, महादेव जावळे, शिवराम भोपे व दिपक तांदळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध (PCMC Crime Branch)घेतला.
आज भक्ती शक्ती चौक, निगडी येथे ब्राऊन रंगाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवर फिरताना दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे,राजेश अनिल कुमार (वय 45, रा. ताडीवाला रोड, पुणे)केशव दशरथ शेटे (वय 46, रा. पिंपरीगाव, पुणे)अशी सांगितली.त्यांच्या ताब्यातील अॅक्टिव्हा गाडीच्या डिकीतून विविध कंपन्यांचे ८ मोबाईल (किंमत अंदाजे ८२ हजार रुपये) जप्त करण्यात आले. अंगझडतीत आरोपी केशव शेटे याच्याकडून १० हजार रुपये रोख व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी परराज्यातील मजुरांना धमकावून व मारहाण करून मोबाईल व पैसे लुटल्याची कबुली दिली. तसेच एका मजुराच्या मोबाईलवरून जबरदस्तीने गुगल पे द्वारे ६३ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचेही उघड झाले.तपासात जप्त करण्यात आलेली अॅक्टिव्हा दुचाकी ही चोरीची असून संभाजीनगर (जि. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 227/2023 भा.द.वि. कलम 379 अन्वये दाखल असल्याचे निष्पन्न (PCMC Crime Branch) झाले.
जप्त मुद्देमाल:
९ मोबाईल फोन – ₹92,000
रोख रक्कम – ₹10,000
अॅक्टिव्हा दुचाकी – ₹30,000
एकूण – ₹1,32,000
या कारवाईत सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 43/2026 तसेच संभाजीनगर (बीड) गुन्हा रजि. नं. 227/2023 असे दोन गुन्हे उघड करण्यात आले (PCMC Crime Branch)आहेत.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
आरोपी केशव दशरथ शेटे याच्यावर सांगवी, पिंपरी, हिंजवडी, खडकी व बीड येथे चोरी, घरफोडी व जबरी चोरीचे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (PCMC Crime Branch) आली.
