Home माझं पिंपरी चिंचवड Seven Resolutions:सात संकल्प, पुन्हा सुरुवात’ – पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहीरनामा प्रसिद्ध

Seven Resolutions:सात संकल्प, पुन्हा सुरुवात’ – पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केले ‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’ जाहीरनामा. सात संकल्पांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पारदर्शक प्रशासनावर भर.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा ‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’ या घोषवाक्याखाली जाहीर केला. जाहीरनाम्यात शहराच्या मूलभूत समस्यांवर ठोस रोडमॅप मांडण्यात आले आहे. रोजच्या पाणीपुरवठ्यापासून ते रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक विकास आराखड्यापर्यंत, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे आश्वासन या घोषणेत समाविष्ट (Seven Resolutions) आहे.

सहा महिन्यांचे ऑन ग्राउंड सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद उपक्रमातून तयार झालेला हा जाहीरनामा पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर आधारित आहे. सतत पाणीपुरवठा, गतिमान वाहतूक, स्वच्छ परिसर, सुलभ आरोग्यसेवा आणि थेट आर्थिक दिलासा या मागण्या ठळकपणे समोर आल्या (Seven Resolutions) आहेत.

अजितदादांन जाहीरनाम्यात सात प्रमुख संकल्प जाहीर केले असून प्रत्येक संकल्प विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला(Seven Resolutions) आहे.

सात संकल्प:

दररोज स्वच्छ पाणीपुरवठा: सुरक्षित नद्या प्रत्येक घरात नियोजित वेळेवर आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा, शून्य टँकर अवलंबित्व, गळतीमुक्त पाइपलाईन आणि नदी पुनरुज्जीवन व पूर (Seven Resolutions)नियंत्रण.

ट्रॅफिकमुक्त, खड्डेमुक्त पीसीएमसी: रस्त्यांची दुरुस्ती ठराविक वेळेत, ठेकेदारांची जबाबदारी, नागरिकांसाठी डिजिटल तक्रार नोंदणी, मेट्रो मार्ग आणि उड्डाणपूल पूर्णत्वाचे (Seven Resolutions)निर्धार.

देशातील सर्वात स्वच्छ शहर: शंभर टक्के कचरा वर्गीकरण, वैज्ञानिक प्रक्रियेत निपटारा, शून्य लँडफिल क्षेत्र आणि गृहनिर्माण (Seven Resolutions)सोसायट्यांना प्रोत्साहन.

परवडणारे, हायटेक आरोग्यसेवा केंद्र: विस्तारित रुग्णालये, १०० उपनगर क्लिनिक्स, कमी दरातील तपासण्या आणि मागास नागरिकांसाठी मजबूत आरोग्य(Seven Resolutions) सुविधा.

पारदर्शक विकास आराखडा: सध्याचा मसुदा डीपी रद्द करून नागरिकांच्या सहभागातून नवीन आराखडा, कायदेशीर घरांचे रक्षण व पुनर्वसन यावर (Seven Resolutions)भर.

पीसीएमसी मॉडेल शाळा: १०० अद्ययावत महानगरपालिका शाळा, राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षित शिक्षक आणि विनामूल्य (Seven Resolutions)सुविधा.

थेट दिलासा आणि जबाबदार प्रशासन: मोफत मेट्रो-बस प्रवास, लघु गृहधारकांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना टॅबलेट वितरण, महिलांसाठी व्याजमुक्त कर्ज योजना आणि क्रीडा-संस्कृतीस(Seven Resolutions) प्रोत्साहन.

हा सात संकल्पांचा पाया फक्त अभ्यास, सर्वेक्षण आणि संवादावर नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख राज्यकारभार, छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचार, महात्मा फुलेंच्या शिक्षणसमतेच्या ध्येय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानतेच्या दृष्टिकोनावर आधारित(Seven Resolutions) आहे.

वाढत्या खर्च, संधीतील विषमता आणि दैनंदिन आर्थिक ताण या पार्श्वभूमीवर ‘सात संकल्प’ नागरिकांना थेट दिलासा, सुलभ पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग (Seven Resolutions)दाखवतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जाहीरनामा घोषणांपेक्षा कृतीकडे नेणारा, ठोस नियोजन आणि प्रामाणिक प्रशासनावर भर देणारा आहे. “सात संकल्प, पुन्हा सुरुवात” या घोषवाक्याद्वारे अजितदादांनी शहरात कार्यक्षम, जबाबदार आणि लोकाभिमुख महानगर प्रशासनाचा स्पष्ट आराखडा मांडला(Seven Resolutions) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00