Home माझं पिंपरी चिंचवड Azambhai Pansare:राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार – आझमभाई पानसरे

Azambhai Pansare:राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार – आझमभाई पानसरे

पिंपरी प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सूत्रे माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी हाती घेतली आहेत. चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी):प्रभाग क्रमांक १४ मधील काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती आणि दत्तवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते व माजी महापौर आझमभाई पानसरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी प्रचाराची सूत्रे स्वतः हाती घेतली असून या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त (Azambhai Pansare) केला आहे.

यावेळी उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर आणि अरुणा लंगोटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते झिशानभाई सय्यद, दिलीप दातीर-पाटील आणि अमोल गाडेकर उपस्थित होते. काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडी आणि चिंचवड स्टेशन परिसरात आझमभाई पानसरे यांचे प्रभावी वर्चस्व असून त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. या भागातील नागरिकांशी त्यांचा थेट संवाद आणि जिव्हाळ्याचे संबंध(Azambhai Pansare) आहेत.

प्रचारादरम्यान आझमभाई पानसरे यांनी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा सविस्तर आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना रणनीतीची दिशा दिली. स्वतः लक्ष घालून प्रचाराचे नियोजन करत त्यांनी उमेदवारांना विजयासाठी(Azambhai Pansare) शुभेच्छा दिल्या.

आझमभाई पानसरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. प्रमोद कुटे आणि वैशाली काळभोर यांनी नगरसेवक म्हणून कार्यकाळात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे. विशाल काळभोर हे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून अरुणा लंगोटे यांच्या पती गणेश लंगोटे यांचेही प्रभागात उल्लेखनीय सामाजिक योगदान आहे. चारही उमेदवारांकडे विकासाचा स्पष्ट व्हिजन असून ते त्याच दिशेने काम करत(Azambhai Pansare) आहेत.”

ते पुढे म्हणाले, “या चारही उमेदवारांच्या पाठीशी प्रभागातील मतदार खंबीरपणे उभे राहतील आणि चौघेही मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन महापालिका सभागृहात पोहोचतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त(Azambhai Pansare) केला.

दरम्यान, प्रचारादरम्यान नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे आशीर्वाद, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांची साथ लाभत असल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना महापालिका सभागृहात पाठवतील, असा विश्वास उमेदवारांनीही व्यक्त (Azambhai Pansare) केला आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00