Home माझं पिंपरी चिंचवड Eknath Shinde Rally:एकनाथ शिंदे यांच्या सभेने शिवसेनेत उत्साह

Eknath Shinde Rally:एकनाथ शिंदे यांच्या सभेने शिवसेनेत उत्साह

प्रभाग १६ मधील उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ किवळे-रावेत-विकासनगर प्रभाग क्रमांक १६ मध्ये आयोजित प्रचार सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ९) मार्गदर्शन केले. या सभेमुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश(Eknath Shinde Rally) संचारला आहे.

या सभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बालासाहेब ओव्हाळे, रेश्मा कातळे, ऐश्वर्या तरस आणि निलेश तरस यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. किवळे-रावेत-विकासनगर परिसरातील मुठाई चौकात ही प्रचार सभा आयोजित करण्यात आली (Eknath Shinde Rally )होती.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमेद इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख सुरेखा उबाळे, उपजिल्हाप्रमुख राजेश खांबे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख विश्वजित बारणे, जिल्हा संपर्क प्रमुख बालासाहेब वालकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शीतल भोंडे, महानगरप्रमुख राजेश वालकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित(Eknath Shinde Rally) होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भगव्याचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. या भूमीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत राहणार नाही, तर सत्तेचा निर्णायक घटक ठरेल. हिंदुत्वसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे. शिवसेनेच्या विचारांशी तडजोड होणार(Eknath Shinde Rally) नाही.”

https://youtube.com/watch?v=o429BPmp69A&si=NWz-jIxowCXb2JDf

दरम्यान, या प्रचार सभेला नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे सभेला विशेष रंगत आली. एकूणच, एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी भाषणामुळे शिवसेनेच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत(Eknath Shinde Rally) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00