प्रतिनिधी :प्रभाग क्रमांक १५ मधील निवडणूक प्रचार आता निर्णायक वळणावर पोहोचला असून, अंतिम रविवारी भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. “आता नाही तर कधीच नाही” या ठाम भूमिकेतून भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हे चौघेही जनतेच्या थेट संपर्कात उतरले होते. सेक्टर २५ परिसरात काढण्यात आलेली ही प्रचार फेरी केवळ औपचारिक पदयात्रा न राहता, मतदारांशी संवाद साधणारी आणि राजकीय ऊर्जा जागवणारी(Ward 15 Campaign) ठरली.
सोमेश्वर मंदिर येथून सुरू झालेल्या या प्रचार दौऱ्याने आयुर्वेदिक कॉलेज परिसर, बी-फिट जिम मार्गे सेक्टर २६ मधील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत मजल मारली. प्रत्येक टप्प्यावर विकासाचे आश्वासन, जनतेवरील विश्वास आणि स्थिर नेतृत्वाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला. हातात हात घालून चालणारे कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यातील एकजूट या फेरीत ठळकपणे दिसून (Ward 15 Campaign)आली.
या प्रचार मोहिमेला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे यांच्या सहभागामुळे युवकांमध्ये विशेष उत्साह संचारला. सलीम भाई शिकलगार, अतुल इनामदार, सचिन कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, शिनकर काका, शाहीर प्रकाश ढवळे यांच्यासह अनेक अनुभवी कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होते. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय ठरला. मीनाक्षी शहा, नीलिमा कोल्हे, संध्या पालांडे, संगीता बोलोद्रा, सुषमा लाड यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी प्रचाराला वेगळीच ताकद दिली. हा प्रचार घोषणाबाजीपेक्षा आपुलकी, संवाद आणि विश्वास निर्माण(Ward 15 Campaign )करणारा होता.
दरम्यान, सिंधुनगर युवक मित्र मंडळाने स्वतंत्रपणे पुढाकार घेत भाजपच्या प्रचाराला बळ दिले. एलआयसी परिसरात आर. एस. कुमार आणि अरुण थोरात (LIG) यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेला वैयक्तिक संपर्क प्रचार ‘शांत पण प्रभावी’ ठरला. अरुण थोरात, किशोर गवळी, गणेश जाधव, प्रदीप लिंगावत, सत्यान देशमुख, महेश अर्नालकर, जालिंदर कदम, विवेक पाटील, आकाश थोरात, करण सूद, अनिश जाधव, तेजस थोरात, अथर्व पाटील, सुनील बुराडे आणि मोहित थोरात यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद(Ward 15 Campaign) साधला.
एकूणच, प्रचाराचा हा शेवटचा रविवार म्हणजे निवडणुकीआधीची निर्णायक क्षणांची सुरुवात ठरली आहे. आश्वासनांपेक्षा अपेक्षा आता अधिक ठळक झाल्या असून, अंतिम निकालाची भाषा मतपेटीतूनच उमटणार आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रचाराचा पडदा खाली येत असला, तरी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा भाजपचा निर्धार या रविवारी स्पष्टपणे अधोरेखित (Ward 15 Campaign)झाला.
