Home माझं पिंपरी चिंचवड Seema Sawale NCP : सीमा सावळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Seema Sawale NCP : सीमा सावळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड — भाजपच्या माजी नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात (Seema Sawale) आहे.

 

सीमा सावळे या तीन वेळा महापालिकेत निवडून आलेल्या अनुभवी नगरसेविका आहेत. त्यांनी यापूर्वी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे(Seema Sawale) बोलले जात आहे.

याच वेळी भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली आल्हाट, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, तसेच शिवसेना ठाकरे गटातील नेताजी काशीद, साधना काशीद आणि तुषार सहाणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (Seema Sawale) केला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि महापालिकेत सक्षम नेतृत्व देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त (Seema Sawale)केला.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या या प्रवेशफेरीमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे चित्र (Seema Sawale)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00