Home क्रीडा Eng Vs Aus:एशेस २०२५: ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर २ दिवसांत दणदणीत विजय | ट्रॅव्हिस हेडचे शतक ठरले निर्णायक

Eng Vs Aus:एशेस २०२५: ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर २ दिवसांत दणदणीत विजय | ट्रॅव्हिस हेडचे शतक ठरले निर्णायक

ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

by Admin
Spread the love

विवेक कुलकर्णी :एशेस २०२५ च्या पहिल्या कसोटी सामन्यात पर्थच्या खेळपट्टीने पहिल्याच दिवशी उचंबळून येत तब्बल १९ फलंदाजांना बाद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हीच खेळपट्टी अचानक फलंदाजांना साथ देऊ लागली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

 

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला आपल्या कालच्या धावसंख्येत फक्त तीन धावांची भर घालता आली. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात जवळपास पन्नास धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. ही आघाडी मिळाल्यानंतर इंग्लिश संघ उत्साहात दिसत होता. त्यांच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही चांगली झाली होती. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत इंग्लंडला कमी धावसंख्येत गुंडाळले. दुसऱ्या डावातही इंग्लंड आपला लौकिक राखू शकला नाही.

 

या संपूर्ण सामन्यात सर्वाधिक चमकला तो ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड. पहिल्या पाच सत्रांत विकेट्स कोसळत असताना त्याने धैर्याने उभे राहून ८३ चेंडूत १२३ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्या या धडाकेबाज शतकाने सामन्याचे रूपडेच बदलून टाकले. इंग्लंडच्या सर्व आशा त्याच्या या खेळीमुळे धुळीस मिळाल्या आणि ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला.

 

हा सामना इतिहासात विशेष ठरला कारण अवघ्या १००.५ षटकांत कसोटी सामन्याचा निकाल लागला. एशेसच्या इतिहासातील हा सर्वांत कमी षटकांत संपणारा निकालाचा सामना म्हणून नोंदला गेला. पहिल्या दिवशी मिशेल स्टार्कच्या सात बळींनी आणि बेन स्टोक्सच्या पाच बळींनी गोलंदाजांनी जोरदार वर्चस्व गाजवले होते, परंतु शेवटचा निर्णायक शब्द ट्रॅव्हिस हेडनेच लिहिला.

 

अखेरीस ऑस्ट्रेलियाने हा सामना आठ गडी राखून जिंकत मालिकेत मजबुत सुरुवात केली आणि १-० अशी आघाडी मिळवली.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00