मोशी येथे झालेल्या भीषण अपघातात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक वाहन रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव संगीत प्रल्हाद काळजे (वय ४८) असे आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल (Hit And Run) करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संगीत काळजे हे दुचाकीवरून भाजी खरेदीसाठी मोशी येथे जात होते. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक बसताच ते खाली पडले आणि टेम्पोच्या (Hit And Run) मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो चालकाने वाहन तसंच टाकून पळ काढला. प्रकरणाचा (Hit And Run) तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.
https://youtu.be/FU1FAhet7FE?si=aXGOemLOReLFHgBc
