पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी चालू आर्थिक वर्षातील मालमत्ताकर न भरल्याने, पहिल्या सहामाहीच्या रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात झाली (PCMC Property Tax Penalty) आहे. करआकारणी व करसंकलन विभागाने ही माहिती दिली.
शहरात निवासी, व्यावसायिक, मोकळ्या जमीन, औद्योगिक आणि मिश्र अशा एकूण सात लाख ३५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिका याच मालमत्तांवरून दरवर्षी कर वसूल करते. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी दीड हजार कोटी (PCMC Property Tax Penalty) रुपये महसूल उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पहिल्या सहामाहीचे कर न भरलेल्या मालमत्ताधारकांवर दोन टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे. दुसऱ्या सहामाहीतील ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत देय असलेल्या रकमेवरदेखील लवकरच दोन टक्के अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा करून (PCMC Property Tax Penalty) अतिरिक्त आर्थिक दंड टाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू
कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीदारांवर जप्तीची मोहिम राबवली जात आहे. त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून, शहरातील विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. करसंकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांतून ही कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू (PCMC Property Tax Penalty) केली जाणार आहे.
