पिंपरी-चिंचवड : Pimpri-Chinchwad मध्ये सायबर गुन्हेगारांचा कहर सुरू असून, CBI अधिकारी असल्याचे भासवून ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Digital Arrest Scam च्या नावाखाली मनी लाँड्रिंग आणि ED कारवाईची भीती दाखवून आरोपींनी ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी Pimpri-Chinchwad Cyber Police यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला (Crime News )आहे.
फोनवरून सुरू झाली फसवणूक; बनावट CBI अधिकाऱ्यांचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड शिवाजी पार्क परिसरात राहणारे अशोक कृष्णा सराफ (वय ७७) यांना अज्ञात व्यक्तींनी फोनद्वारे संपर्क साधला.सुरुवातीला आरोपींनी टेलिफोन विभागातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व्हिलन्स अधिकारी आणि शेवटी CBI अधिकारी असल्याचे भासवून विश्वास संपादन(Crime News) केला.
‘तुमचे खाते मनी लाँड्रिंगमध्ये वापरले’ – अटकेची धमकी
आरोपींनी सराफ यांना सांगितले की, त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्याचा वापर नरेश गोयल प्रकरणातील ED कारवाईशी संबंधित मनी लाँड्रिंगसाठी झाला आहे.“तुम्हाला कधीही अटक होऊ शकते,” अशी धमकी देत त्यांना तासन्तास **व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’**मध्ये ठेवण्यात(Crime News) आले.
‘लीगल व्हेरिफिकेशन’च्या नावाखाली १ कोटी रुपये ट्रान्सफर
अटकेच्या भीतीने आरोपींच्या दबावाखाली सराफ यांनी त्यांच्या बँक खात्यातील व म्युच्युअल फंडातील रक्कम ‘लीगल व्हेरिफिकेशन’साठी ट्रान्सफर करण्यास होकार दिला.आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर त्यांनी एकूण १ कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.पैसे मिळताच आरोपींनी सर्व संपर्क बंद केला आणि कोणतीही रक्कम परत केली (Crime News)नाही.
Pimpri-Chinchwad Cyber Police कडून गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सराफ यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि IT Act अंतर्गत गुन्हा नोंदवला असून,संशयास्पद मोबाईल नंबर, बँक खाती व डिजिटल व्यवहारांचा तपास सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नाळे करत(Crime News) आहेत.
Digital Arrest Scam बाबत पोलिसांचा इशारा
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.कोणतीही CBI, ED किंवा पोलीस यंत्रणा व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही किंवा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही.अशा संशयास्पद कॉल्स आल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क(Crime News) साधावा.
