Home आरोग्य Pavna Dam :पवना धरणातील पाणीसाठा 20.40%, शहर वासियांसाठी दिलासादायक बातमी

Pavna Dam :पवना धरणातील पाणीसाठा 20.40%, शहर वासियांसाठी दिलासादायक बातमी

पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा २०.४०% वर पोहोचला आहे. धरण परिसरात पावसाचा वेग संथ असला तरी जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग बंद असून, आगामी पावसामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

by Admin
Spread the love

(मावळ, प्रतिनिधी दि. ४) : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप संथ असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. शनिवार (४ जुलै) सायंकाळपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा २०.४० टक्क्यांवर पोहोचल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला (Pavna Dam)आहे.

 

धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत धरण परिसरात २४ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ३९८ मिमी इतके झाले आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६०१.४६ मीटर असून, एकूण पाणीसाठा ८०.३० दशलक्ष घनमीटर (Mm³) आणि उपयुक्त पाणीसाठा ४९.१५ दशलक्ष घनमीटर (Mm³) इतका(Pavna Dam) आहे.

 

दरम्यान, धरणात अद्याप अपेक्षित प्रमाणात जलसाठा उपलब्ध नसल्याने जलविद्युत केंद्र (हायड्रो) तसेच मुख्य सांडव्यावरून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सध्या पूर्णपणे बंद (०० क्युसेक) ठेवण्यात आला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली(Pavna Dam) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00