Home माझं पिंपरी चिंचवड School Midday Meal:५७ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम; केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन

School Midday Meal:५७ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम; केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३०० शाळांतील ५७ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, अन्नामृत फाउंडेशनच्या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन झाले.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६ ): विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आज उद्घाटन करण्यात आले. या अद्ययावत सुविधेमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३०० शाळांमधील तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम होणार (School Midday Meal)आहे.

 

अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार पुरविला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषणमूल्ये लक्षात घेऊन केंद्रीय स्वयंपाकगृह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत करण्यात आले आहे. आहार तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्यात येणार (School Midday Meal)आहे.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस आणि पौष्टिक आहार मिळणे हीदेखील आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार उपलब्ध करून दिला जात असून, या व्यवस्थेत स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम राखणे आवश्यक आहे. आधुनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आलेले हे केंद्रीय स्वयंपाकगृह त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण(School Midday Meal) ठरेल.”

 

ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांना मिळणारा प्रत्येक घास सुरक्षित, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण असावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य पोषण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातही विद्यार्थीकेंद्री उपक्रमांना प्राधान्य देत शैक्षणिक आणि पोषणविषयक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला(School Midday Meal) जाईल.”

 

आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य

 

या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तथा आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि अधिक सक्षम पोषण आहार व्यवस्था उभारण्यास मदत झाली. महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे काम यापुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार(School Midday Meal) आहे.

 

शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून, विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आवश्यक पोषण मिळवून देण्यात या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे आहाराचे वितरण करण्याबरोबरच त्याची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पौष्टिकता सातत्याने सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करण्यात आले (School Midday Meal)आहे.

 

या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरु गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह अन्नामृत फाउंडेशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित(School Midday Meal) होते.

 

अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहामुळे मोठ्या प्रमाणावर पोषण आहार तयार करण्याची क्षमता वाढणार असून, स्वच्छता व अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत गुणवत्तापूर्ण आहार पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण व उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार(School Midday Meal) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00