Home तंत्रज्ञान Swagatam E-Pravesh:‘स्वागतम ई-प्रवेश’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद

Swagatam E-Pravesh:‘स्वागतम ई-प्रवेश’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद, तर ३९ हजार ४४३ नागरिकांनी आगाऊ ऑनलाइन नोंदणीचा लाभ घेतला.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांसाठी १ मे २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ मे ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत या प्रणालीवर ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद झाली असून, ३९ हजार ४४३ नागरिकांनी आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून महापालिका मुख्य इमारतीस भेट दिली आहे. आतापर्यंत १४ हजार ७२३ नागरिकांनी प्रणालीवर आपली लॉगिन खाती तयार केली (Swagatam E-Pravesh)आहेत.

 

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे, प्रतीक्षा वेळ कमी करणे आणि भेटीची डिजिटल नोंद ठेवणे, या उद्देशाने ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या संबंधित विभागाची निवड करून भेटीची ऑनलाइन नोंदणी करता (Swagatam E-Pravesh)येते.

 

सर्वाधिक भेटी दिलेले विभाग

 

या प्रणालीद्वारे सर्वाधिक भेटी नोंदविणाऱ्या विभागांमध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ९ हजार ३६१, नगररचना विभाग ४ हजार ३११, स्थापत्य विभाग ३ हजार ७९२, वैद्यकीय विभाग २ हजार ४०३, महापौर कार्यालय २ हजार ३०६, आरोग्य विभाग १ हजार ९२०, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग १ हजार ५७१, पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग १ हजार ४९१, आयुक्त कार्यालय १ हजार ३३० आणि लेखा विभाग १ हजार २४९ नागरिकांनी भेट दिली (Swagatam E-Pravesh)आहे.

 

ऑनलाइन नोंदणीची सुविधा

 

नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे नोंदणी करावी. प्रथमच नोंदणी करताना पूर्ण नाव, पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती देऊन लॉगिन खाते तयार करावे लागते. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. त्यानंतर लॉगिनद्वारे थेट भेटीची नोंदणी करता (Swagatam E-Pravesh)येते.

 

नोंदणीदरम्यान मोबाईल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी केली जाते. एका भेटीसाठी किमान एक आणि कमाल तीन विभागांची निवड करता(Swagatam E-Pravesh) येते.

 

पुढील सात दिवसांतील तारखा उपलब्ध

 

नोंदणी करताना पुढील सात दिवसांतील उपलब्ध तारखा प्रणालीवर दिसतात. शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून नागरिकांना इच्छित दिनांक व संबंधित विभागाची निवड करता येते. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर क्यूआर कोड डाउनलोड करता येतो. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवेश दिला (Swagatam E-Pravesh)जातो.

 

क्यूआर कोड नंतरही लॉगिन अकाऊंटमधून डाउनलोड करता येतो. तसेच आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांना प्रवेशाच्या दिवशीही क्यूआर कोड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध(Swagatam E-Pravesh) आहे.

 

वेळेची बचत आणि पारदर्शक प्रवेश व्यवस्था

 

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीमुळे नागरिकांना भेटीपूर्वीच विभाग व दिनांक निश्चित करता येत असल्याने प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होत आहे. प्रत्येक प्रवेशाची डिजिटल नोंद उपलब्ध होत असल्याने प्रवेश व्यवस्थेत शिस्त, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढली(Swagatam E-Pravesh) आहे.

 

महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीस भेट देण्यापूर्वी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले (Swagatam E-Pravesh)आहे.

 

“महापालिकेच्या सेवा नागरिककेंद्रित, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज आहे. ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच प्रवेश व्यवस्थेत शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकता निर्माण होत आहे. या प्रणालीला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असून, भविष्यात नागरिकांच्या गरजेनुसार अशा डिजिटल सुविधांचा अधिक विस्तार करण्यात येईल. नागरिकांनी शक्यतो आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून या सुविधेचा लाभ (Swagatam E-Pravesh)घ्यावा.”

 

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00