Home तंत्रज्ञान Tata Industry Awards:जे. आर. डी. आणि रतन टाटा भारतीय उद्योगाचे अध्वर्यू : सचिन ईटकर टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

Tata Industry Awards:जे. आर. डी. आणि रतन टाटा भारतीय उद्योगाचे अध्वर्यू : सचिन ईटकर टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

चिंचवडमध्ये टाटा उद्योग पुरस्कार सोहळा संपन्न. सचिन ईटकर यांनी जे. आर. डी. आणि रतन टाटा यांना भारतीय उद्योगाचे अध्वर्यू म्हटले. सहा उद्योजकांचा सन्मान.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. १२ सप्टेंबर २०२६) : “भारतरत्न जे. आर. डी. टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे अध्वर्यू आहेत,” असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांनी (Tata Industry Awards)काढले .

 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे यांच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात आयोजित टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. यावेळी टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आणि परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित(Tata Industry Awards) होते.

 

याप्रसंगी स्पार्क इंजिनिअर्सच्या संचालिका डॉ. सुनीता पाटसकर, बी. पी. मेटाटेक एलएलपीचे संचालक प्रवीण माळी, ज्योती हीटसिंक्स अँड एन्क्लोजर्सचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब गुंजाळ, मेणार ऑटो कॉम्पोनंट्सचे संचालक तानाजी बाबर, एस अँड पी इंजिनिअर्सचे संस्थापक प्रशांत ढवळे आणि विकास इंडस्ट्रीजच्या संचालिका वैशाली ढवळे यांना विविध टाटा उद्योग पुरस्कारांनी सन्मानित करण्यात (Tata Industry Awards)आले.

 

टाटा उद्योगसमूह आपल्या नफ्यातील मोठा वाटा सामाजिक कार्यासाठी देतो. या समूहाने भारताच्या विकासाचा पाया रचला असून, त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक उद्योजक रोजगारनिर्मिती करीत आहेत, असे सचिन ईटकर यांनी (Tata Industry Awards)सांगितले.

 

मनोहर पारळकर यांनी उद्योग क्षेत्रातील यशामागील कष्ट अधोरेखित करत, विश्वासार्ह आणि यशस्वी तरुण उद्योजकांमुळे महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे नमूद(Tata Industry Awards) केले.

 

कुमार खोंद्रे यांच्या पिंपरी-चिंचवडच्या लावणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकात सामाजिक योगदान आणि कामगारांप्रति बांधिलकी या निकषांवर पुरस्कारार्थींची निवड केल्याचे सांगितले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अरुण गराडे, जयश्री श्रीखंडे, बाजीराव सातपुते, महेंद्र भारती, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, प्रतिमा काळे, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर आणि स्वाती भोसले यांनी सहकार्य(Tata Industry Awards) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00