Home माझं पिंपरी चिंचवड Nigdi Jnpv Ganeshotsav: ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

Nigdi Jnpv Ganeshotsav: ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात ‘पूजा-संस्कार-परंपरा आणि सामाजिक कर्तव्य’ या संकल्पनेवर गणेशोत्सव; व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक विसर्जनाचे आयोजन.

by Admin
Spread the love

(निगडी, प्रतिनिधी ): ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातर्फे यंदाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. गणेश आराधनेसह व्याख्याने, संगीत-नृत्य, पारंपरिक कला आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले(Nigdi Jnpv Ganeshotsav) आहेत.

 

गणेशोत्सवाची सुरुवात सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गणेशप्रतिष्ठापनेने होईल. बुधवार, १६ सप्टेंबर रोजी ‘मेघमल्हार महोत्सवा’त गायन, संतूरवादन आणि नृत्य सादर केले (Nigdi Jnpv Ganeshotsav)जाईल.

 

रविवार, २० सप्टेंबर रोजी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘भारताला विश्वगुरू बनवण्यात युवकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवार, २१ सप्टेंबर रोजी पद्मश्री गिरीश प्रभुणे ‘भारतीय ज्ञानपरंपरा’वर, तर मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी नचिकेत नितसुरे ‘तरुणाईने समाजसुधारकांचे वारसदार होणे’ या विषयावर मार्गदर्शन (Nigdi Jnpv Ganeshotsav)करतील.

 

बुधवार, २३ सप्टेंबर रोजी ‘कोकणी आरत्या आणि भोवताळा’ हा कार्यक्रम होईल. गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी उत्तरपूजा, प्रात्यक्षिक आणि पर्यावरणपूरक विसर्जनाने उत्सवाची सांगता(Nigdi Jnpv Ganeshotsav) होईल.

 

सर्व कार्यक्रम श्री गणेश मंडप, ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र येथे होणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख  मनोज देवळेकर तसेच गणेशोत्सव समितीचे वेदांत कट्टी आणि मीरा शेटे इनामदार यांनी केले(Nigdi Jnpv Ganeshotsav) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00