Home माझं पिंपरी चिंचवड Inner Wheel Club Nigdi Pride:जर्मन भाषा शिक्षण आणि बीजगोळे निर्मिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Inner Wheel Club Nigdi Pride:जर्मन भाषा शिक्षण आणि बीजगोळे निर्मिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइडतर्फे विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषा मार्गदर्शन व बीजगोळे निर्मिती उपक्रम. १०० विद्यार्थ्यांची जर्मन वर्गासाठी नोंदणी, तर ६०० विद्यार्थ्यांनी तयार केले ६५० बीजगोळे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइडतर्फे FLOA उपक्रमांतर्गत जर्मन भाषा वर्गाचा मार्गदर्शनपर परिचय कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी शिवभूमी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, सर्व विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा वर्गासाठी नोंदणी (Inner Wheel Club Nigdi Pride) केली.

 

कार्यक्रमात श्री. शैलेश लेले यांनी जर्मन भाषा शिकण्याची प्रक्रिया, उपलब्ध संधी, पद्धती आणि भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. या १०० विद्यार्थ्यांच्या जर्मन भाषा परीक्षेचे शुल्क इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइडतर्फे भरण्यात (Inner Wheel Club Nigdi Pride)आले.

 

बीजगोळे निर्मितीत ६०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

पिंपरी-चिंचवड : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइडतर्फे हरित पर्यावरण व पुनरावर्तन ग्रुपच्या सहकार्याने पिंपळे सौदागर येथील रायका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बीजगोळे निर्मिती उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात ६०० हून अधिक विद्यार्थी आणि १२ शिक्षक सहभागी (Inner Wheel Club Nigdi Pride)झाले.

 

विद्यार्थ्यांनी फणस, जांभूळ, चिकू, गुलमोहर, चिंच, आवळा आदी वृक्ष व फळझाडांच्या बियांचा वापर करून सुमारे ६५० बीजगोळे तयार केले. फळांच्या बिया न फेकता त्यांचा पुनर्वापर करून नवीन झाडांची निर्मिती कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात (Inner Wheel Club Nigdi Pride)आले.

 

माती व बियांच्या माध्यमातून बीजगोळे तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि पुनर्वापराची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात (Inner Wheel Club Nigdi Pride)आला.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00