Home कृषीविश्व Agriculture Department:कृषी विभागाचा अ-तांत्रिक आकृतिबंध रद्द करण्यासाठी ॲड. अनंत चोंदे पाटील यांचे बेमुदत उपोषण

Agriculture Department:कृषी विभागाचा अ-तांत्रिक आकृतिबंध रद्द करण्यासाठी ॲड. अनंत चोंदे पाटील यांचे बेमुदत उपोषण

ॲग्रीकॉस कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनंत चोंदे पाटील यांचे कृषी आयुक्त कार्यालयासमोर आठव्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू.

by Admin
Spread the love

(पुणे, प्रतिनिधी 12 सप्टेंबर 2026): ऍग्रीकॉस कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनंत चोंदे पाटील यांनी कृषी विभागाचा अ-तांत्रिक आकृतिबंध तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ५ सप्टेंबरपासून पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस असून, कृषी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना पाठिंबा दर्शविला (Agriculture Department)आहे.

 

कृषिमंत्री दत्ता भरणे यांना दिलेल्या निवेदनात ॲड. अनंत चोंदे पाटील यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये २७ डिसेंबर हा डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जयंतीदिन ‘ॲग्रीकॉस डे’ म्हणून जाहीर करावा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा महाडीबीटीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये भरतीच्या जाहिराती तात्काळ प्रसिद्ध कराव्यात, अशा मागण्यांचा समावेश (Agriculture Department)आहे.

 

याशिवाय, कृषीविषयक अभ्यासक्रम तात्काळ लागू करावेत, कृषी पदवीधरांची शिक्षक म्हणून भरती करावी, तसेच एरिया ट्रीटमेंटनुसार मर्यादित मृदासंधारणाची कामे कृषी विभागामार्फत करण्यात यावीत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली(Agriculture Department) आहे.

कृषी विभागाचा अ-तांत्रिक आकृतिबंध रद्द करण्यासह या सर्व मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अशी भूमिका ॲड. चोंदे पाटील यांनी घेतली आहे. मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कृषी क्षेत्रातून व्यक्त होत (Agriculture Department)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00