Home गुन्हे Pcmc School Vans:पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय वाहनांवर पोलिसांची कारवाई; ६९ वाहनांना दंड, ₹३.०६ लाखांचा दंड

Pcmc School Vans:पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय वाहनांवर पोलिसांची कारवाई; ६९ वाहनांना दंड, ₹३.०६ लाखांचा दंड

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय वाहनांवर वाहतूक पोलिस व आरटीओची संयुक्त कारवाई. १५१ वाहनांची तपासणी, ६९ वाहनांवर ₹३.०६ लाखांचा दंड.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत १५१ शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करून एकूण ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात (Pcmc School Vans)आला.

शालेय वाहनांबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर २९ जून, ३० जून, २ जुलै आणि २० जुलै २०२६ रोजी ही मोहीम राबविण्यात आली. पिंपरी, वाकड, सांगवी, भोसरी, चिंचवड, तळवडे आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहनांची तपासणी करण्यात(Pcmc School Vans) आली.

या वेळी वाहनांची कागदपत्रे, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन आणि इतर वाहतूक नियमांची पडताळणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात (Pcmc School Vans)आली.

वाहतूक शाखेच्या वाकड विभागाने अशा संयुक्त तपासणी मोहिमा प्रत्येक पंधरवड्याला राबविण्याचे नियोजन केले (Pcmc School Vans)आहे.

ही मोहीम पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि पोलिस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार(Pcmc School Vans) पडली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00