Home माझं पिंपरी चिंचवड Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पावसाळ्यातील पूर, अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज. पूर नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल आणि 'आपदा मित्र' यंत्रणा २४ तास कार्यरत.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे आणि संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना (Dr.Vijay Suryawanshi)केली.

 

महापालिकेने पूर, अतिवृष्टी, आग, इमारत दुर्घटना आणि इतर आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात इन्सिडेंट कमांडर व सब-इन्सिडेंट कमांडर नियुक्त केले आहेत. आपत्तीपूर्व तयारी, संवेदनशील भागांचे सर्वेक्षण, बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

 

मुसळधार पावसानंतर पाणी साचणारी आणि पूरस्थिती निर्माण होणारी ठिकाणे ओळखून त्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करणे, डी-वॉटरिंग पंप उपलब्ध ठेवणे आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्यावर भर देण्यात आला (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

 

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी संवेदनशील भागांत ‘आपदा मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच महापालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास सज्ज असून, शहरातील १० अग्निशमन केंद्रांमध्ये रेस्क्यू बोटी, लाइफ जॅकेट, लाइफ बॉय, दोरखंड, डी-वॉटरिंग पंप आणि अन्य अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

 

पवना धरण परिसरातील पर्जन्यमान, धरणातून होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, पूरस्थितीची शक्यता निर्माण झाल्यास नदीकाठच्या नागरिकांना वेळेत पूर्वसूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

 

महापालिकेचा पूर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, अग्निशमन, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत आणि इतर विभागांमध्ये समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्याचे नियोजन करण्यात आले (Dr.Vijay Suryawanshi) आहे.

 

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पाणी साचणे, झाड पडणे, पूरस्थिती किंवा अन्य आपत्कालीन घटना आढळल्यास तातडीने नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Dr.Vijay Suryawanshi)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00