पिंपरी चिंचवड (दि. ३० मार्च २०२६) : पूर्णानगर व शिवतेजनगर परिसरात प्रथमच सकल हिंदू समाजाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल, शनी मंदिर मैदान येथे भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले. या संमेलनाला हजारो हिंदू बांधव-भगिनी उपस्थित (Virat Hindu Sammelan) होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम यांच्या भव्य मिरवणुकीने झाली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक युद्धकला, तलवारबाजी, दांडपट्टा तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रमुख पाहुण्यांचे जंगी स्वागत करण्यात(Virat Hindu Sammelan) आले.
यावेळी सज्जनगडाचे महंत अजय बुवा रामदासी महाराज यांनी हिंदूंनी जाती-पाती व पंथभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन केले. “हिंदूंना धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने समाज विखुरला आहे. केवळ घोषणा नव्हे, तर कृतीतून धर्म जपणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचेही त्यांनी (Virat Hindu Sammelan) सांगितले.
अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी “हिंदू धर्म ही केवळ श्रद्धा नसून जीवनपद्धती आहे. स्त्रीला पुरुषाच्या जीवनात समान स्थान दिले गेले आहे,” असे सांगत कुटुंबसंस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांना धर्म, संस्कृती व इतिहासाचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद (Virat Hindu Sammelan) केले.
मिलिंद महादेव कांबळे यांनी समाजाच्या एकतेसाठी शिक्षणासोबत संघटन आणि आर्थिक सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले. “तुम्ही-आम्ही सकळ हिंदू, बंधू-बंधू” या विचारातून जातीभेद दूर होतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच उद्योजकतेकडे वळण्याचे, कुटुंबसंवाद वाढवण्याचे आणि पर्यावरण संरक्षणाचे आवाहनही त्यांनी (Virat Hindu Sammelan) केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र पाटील यांनी केले, सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र कुलकर्णी यांनी (Virat Hindu Sammelan) केले.
